Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ४९३ नवे रुग्ण, ३ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ४९३ नवे रुग्ण, ३ जणांचा मृत्यू!

Related Story

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत ४९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ५६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १४ हजार ५६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४२० जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ९६ हजार ७६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ हजार ५३१ जणांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

जळगावमधील किनगावजवळ मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


मुंबईत आरे कॉलनीतील जंगलात भीषण आग लागली होती. आता ही नियंत्रणात आली आहे. रॉयल पाम हॉटेलजवळ आग ही भीषण आग लागली होती. या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या पोहोचल्या होत्या.


गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.


राठोड कुठे आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे- गृहमंत्री अनिल देशमुख


८ दिवस राहणार होम क्वारंटाईन – गृहमंत्री अनिल देशमुख


एमएमआरडीए आयुक्त ईडी चौकशीसाठी उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता हजर राहणार Mmrda अधिकृत माहिती.
टॉप्स सेक्युरीटी, प्रताप सरनाईक प्रकरण


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुव छावा संघटना आक्रमक, कार्यकर्त्यांचा मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न


पुजा चव्हाण आत्महत्येप्रककरणी आवाज उठवल्याने धमक्यांचे फोन – आमदार अतुल भातकळकर


ज्येष्ठ न्यायमुर्ती पी.बी.सांवत यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पहिल्या एल्गार परिषदेचं अध्यक्ष होते. पुण्याच्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास


मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, मुंबईत सध्या 5068 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई मंडळात 1141 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर 13 लोकांच्या मृत्यू झाला आहे.


उत्तप्रदेशातील चमेली येथे झालेल्या हिमकडा दुर्घटनेत आत्तापर्यंत ५३ जणांचे मृत्यूदेह मिळाले आहेत. तपोवनमध्ये सध्या पोलीस, सीडीआरएफ, एनडीआरएफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. याघटनेनंतर २०६ जण बेपत्ता नागरिकांमधील ५३ लोकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर १५१ जण अजूनही बेपत्ता आहेत.


जळगावमध्ये भीषण अपघात, १६ मजुरांचा मृत्यू, पपई वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात, ५ जण गंभीर जखमी


देशात पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे. आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे.


देशात आज गाडीला फास्ट टॅग लावण्यासाठी शेवटचा दिवस आहे. नाहीत यापुढे डबल टोल भरावा लागणार आहे. टोल नाक्यांवरील फास्ट टॅगला आता मुजतवाढ नाही.


 

- Advertisement -