घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

Subscribe

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेन

मुंबई-मंडुआडीह सुपरफास्ट विशेष सेवांमध्ये वाढ

०१२२५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २३ एप्रिल २०२१ रोजी १४.३० वाजता सुटेल व छापरा येथे तिसर्‍या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल. ०१२२६ विशेष छपरा येथून दि. २६ एप्रिल २०२१ रोजी ०५.४० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा फोर्ट, टुण्डला जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, भटनी, सीवान जं. या स्थानकांवर ही गाडी थांबवण्यात येईल. २२ द्वितीय आसन श्रेणी अशी संरचना करण्यात आली आहे.मुंबई-मंडुआडीह सुपरफास्ट विशेष सेवांमध्ये वाढ करण्यात आली असून ०११०१/०११०२ मुंबई-मंडुआडीह अतिजलद विशेष रेल्वेची सेवा द्वि-साप्ताहिक पासून आठवड्यातून चार दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई-मंडुआडीह अतिजलद विशेष
०११०१विशेष दि. २१ एप्रिल २०२१ ते १ में २०२१ पर्यंत दर रविवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी २१.४५ वाजता सुटेल आणि मंडुवाडीह येथे दुसर्‍या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. ०११०२ विशेष दि. २१ एप्रिल २०२१ ते १ में २०२१ पर्यंत मंगळवार, शुक्रवार, सोमवार आणि गुरुवारी ००.३५ वाजता मंडुवाडीह येथून सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी ०३.५५ वाजता पोहोचेल.
या विशेष ट्रेनची वेळ, थांबे आणि संरचना याआधी घोषित केल्याप्रमाणेच असतील. पूर्णतः आरक्षित असलेल्या ०११०१ अतिजलद विशेष ट्रेनच्या वाढीव सेवांसाठी आणि ०१२२५ या उन्हाळी विशेषचे बुकिंग २२ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

मुंबई/पुणे – गोरखपूर तसेच पुणे – भागलपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या आणि ग्रीष्मकालीन विशेष गाड्या

मध्य रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलानुसार विशेष शुल्कासह पूर्णपणे आरक्षित अतिरिक्त विशेष गाड्या आणि ग्रीष्मकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे:

- Advertisement -

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (एक मार्गी)

०१२२९ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.१० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल. कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकांवर थाबवण्यात येतील व २ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, १४ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल.

पुणे-भागलपूर विशेष

०१४६१ विशेष पुणे येथून शनिवार दि. २४ एप्रिल २०२१ रोजी ०६.१० वाजता सुटेल व भागलपूर येथे दुसर्‍या दिवशी १८.४० ​​वाजता पोहोचेल. ०१४६२ विशेष भागलपूर येथून रविवारी दि. २५.४.२०२१ रोजी २२.०० वाजता सुटेल व पुणे तिसर्‍या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया, किउल, जमालपूर. या स्थानकांवर थांबतील. तसेच ७ शयनयान, ११ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल.

पुणे-गोरखपूर विशेष

०१४६७विशेष पुणे येथून शनिवार दि. २४ एप्रिल २०२१ रोजी ०९.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी १८.३० वाजता पोहोचेल. ०१४६८ विशेष गोरखपूर येथून रविवार दि. २५ एप्रिल २०२१ रोजी २१.३० वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्‍या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल. तसेच दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती. या स्थानकांवर थांबवण्यात येतील व १ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- गोरखपूर विशेष (एक मार्गी)

०१२३१ विशेष शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०५.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी १६.४५ वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती. या स्थानकांवर थांबवण्यात येतील. तसेच १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी. अशी संरचना असेल. ०१२२९, ०१४६१, ०१४६७ आणि ०१२३१ या पूर्णतः आरक्षित असलेल्या अतिरिक्त विशेष आणि ग्रीष्मकालीन विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २२ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष रेल्वेगाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in वर भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -