घरताज्या घडामोडीपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, एकूण ७० टक्के मतदान

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, एकूण ७० टक्के मतदान

Subscribe

राज्यातील विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान पार पडले

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान पार पडले. ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

- Advertisement -

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण ५ लाख 26 हजार २५७ मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत २ लाख ११ हजार ९६ मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये ४९.५२ टक्के मतदान झाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत ८ जिल्ह्यांमध्ये दुपारी ३ पर्यंत ४३ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादमधून सतिश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचे आव्हान आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ६ हजार ४५४ मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३.६४ टक्के मतदान झाले. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ८२.९१ टक्के मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये एकूण ३५,६२२ मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात आहे.पुणे शिक्षक मतदारसंघात सायंकाळी ४ पर्यंत ६७ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसनगावकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. २०१४ ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे.

- Advertisement -

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ५ वाजेपर्यंत ४३७ पैकी ४३४ (९९.३१ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ.अभिजीत पाटील यांचे आव्हान आहे. भाजप विरोधात महाविकासआघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवल्यामुळे अमरीश पटेल जागा राखणार का हे पाहावे लागणार आहे.

झालेले मतदान
औरंगाबाद (पदवीधर) ६१.०८ टक्के
पुणे (पदवीधर) ५०.३० टक्के
नागपूर (पदवीधर) ५४.७६ टक्के
अमरावती (शिक्षक) ८२.९१ टक्के
पुणे (शिक्षक) ७०.४४ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -