घरताज्या घडामोडीमुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Subscribe

ड्रोन, पॅराग्लायडर्सवरील बंदी वाढवली

ड्रोन, पॅराग्लायडर्सवरील बंदी वाढवलीमुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस उपायुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी हे आदेश दिले असून या आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध भा.दं.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईवर ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅराग्लायडर्सद्वारे हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे या उपकरणांवर याअगोदर 30 ऑक्टोबर 2020 पासून 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा बंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.

दहशतवाद्यांकडून व्हीव्हीआयपी ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ड्रोन, लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंगला 29 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

- Advertisement -

सार्वजनिक मालमत्ता हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते
सार्वजनिक मालमत्तादेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. इंटेलिजन्स विभागाच्या सूचनेनंतर परिसरात कोणत्याही उड्डाण करणार्‍या वस्तूवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पुढील 29 डिसेंबरपर्यंत लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर भा.दं.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे. सामान्य लोकांनी घाबरु नये तर सावधगिरी बाळगावी. घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येकाने सावध राहा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -