घरताज्या घडामोडीअंजुमन दर्द मंदाने संस्थेकडून पुरग्रस्त १५०० कुटुंबाना प्रत्येकी १० हजाराच्या संसारोपयोगी वस्तुंचे...

अंजुमन दर्द मंदाने संस्थेकडून पुरग्रस्त १५०० कुटुंबाना प्रत्येकी १० हजाराच्या संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

Subscribe

महाड मधील छोट्या व्यापाऱ्यांना उभं करण्यासाठी प्रयत्न करणार : मुफ्ती रफीक पुरकर

कोकणासह महाराष्ट्रात व अन्य राज्यात कुठलीही आपत्ती ओढवली की मदतीसाठी मानवतेच्या भावनेतून सर्व प्रथम धाव घेणाऱ्या महाड मधील अंजुमन दर्द मंदाने तालीम ए तरक्की ट्रस्ट या संस्थेच्या वतीने महाड शहर व तालुक्यातील पुरग्रस्त गावांतील नागरिकांना त्यांचे संसार उभे करण्यासाठी मोलाची साथ दिली आहे. सुरुवातीस पुरग्रस्त कुटुंबांना अन्न धान्याचे किट त्यानंतर दररोज सलग १२ दिवस १५०० ते २००० जेवण नाष्ट्याचे पार्सल वाटप करून त्यांना आधार दिला. त्यानंतर तालुक्यातील गरजु व गरीब १५०० कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयाचे संसारोपयोगी वस्तु इसाने कांबळे येथील हायस्कुलमधील मॉल मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाड शहर व तालुक्यातील पुरग्रस्त कुटुंबांना सर्व ठिकाणाहून भरपूर प्रमाणात अन्न धान्य व इतर सामानाचे वाटप करण्यात आले. अंजुमन दर्दमंदाने तालीम तरक्की ट्रस्ट च्या वतीनेही सुरुवातीस या पुरग्रस्तांना अन्नधान्य व इतर सामानां च्या किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सलग १२ दिवस १५०० ते २००० नाष्टा व जेवणाची पार्सल सकाळ सायंकाळ पुरग्रस्त कुटुंबाला पुरवण्यात आली यासाठी संस्थेच्या इसाने कांबळे येथील हायस्कुल मध्ये नाष्टा व जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

ज्या पुरग्रस्त कुटुंबाचे संपुर्ण घर उध्वस्त झाले आहे त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तु व विजेची उपकरणे पाण्यात भिजल्याने वापरा अयोग्य झाली आहेत अशा १५०० कुटुंबांना प्रत्येकी १० हजारचे कुपन वाटप करून त्यांना इसाने कांबळे येथील शॉपिंग मॉल मध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तु घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यासाठी संस्थेच्या २०० कर्मचाऱ्यांची टिम गेली ८ ते १० दिवस दिवस रात्र काम करीत असून त्यांच्या अथक मेहनतीतून हे शॉपिंग मॉल उभे राहीले आहे. अंजुमन मार्फत सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.

अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट चे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर यांनी यापुढे ज्यांचे घर या महापुरात उध्वस्त झाले आहे व ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा छोट्या व्यापाऱ्यांना पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न अन्य दानशूर सामाजिक व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यातून करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगितले. यावेळी संस्थेला पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी ज्या ज्या संस्था व व्यक्ती नी मदत दिली त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

                                                                                                 – निलेश पवार (महाड)


हेही वाचा – स्वत:च्या चुकीचा इव्हेंट कसा करायचा हे केंद्राकडून शिकावं; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -