घरताज्या घडामोडीभाजपकडून मराठा, ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, विधेयकावरुन गजानन किर्तीकर यांची टीका

भाजपकडून मराठा, ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, विधेयकावरुन गजानन किर्तीकर यांची टीका

Subscribe

आरक्षणातील ५० टक्क्यांची शिथिलता आणि १२७ व्या घटनादुरुस्तीच्या विधेयकावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी १२७ व्या घटानादुरुस्तीच्या विधेयकावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. मराठा, ओबीसींच्या तोंडाला भाजपकडून तोंडाला पुसण्याचं काम या विधेयकामधून करण्यात आलं आहे. तसेच आजारी माणसाला पूर्ण गोळी न देता अर्धीच गोळी देण्यात आली असल्याची टीका खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे. विधेयक पारित करुन केंद्र सरकारनं आजारी माणसाला गोळी दिली मात्र ती पण आर्धीच मग तो आजारी माणूस बरा कसा होणार? असे विधान किर्तीकर यांनी केलं आहे. आरक्षणामधील ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र भाजपने विधेयकाच्या नावावर तोंडाला पानं पुसण्याचे काम केलं आहे.

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आरक्षणातील ५० टक्क्यांची शिथिलता आणि १२७ व्या घटनादुरुस्तीच्या विधेयकावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरक्षणाच्या मर्यादेमुळे राज्यास एखाद्या समाजाला आरक्षण देण्यात अनेक अडथळे येत आहेत. यामुळे ५० टक्क्यांची अट शिथिल करुन राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतू भाजपने मराठा आणि ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याची काम हे विधेयक पारित करुन केलं आहे. यासाठी भाजपचा निषेध करतो आहे.

- Advertisement -

आरक्षणाबाबत केंद्र सराकरने नोंद घेतली यामुळे या घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. हे कृत्य म्हणजे आजारी माणसाला आर्धी गोळी देण्यासारखे आहे. इंदिरा सहानी प्रकरणात जो निर्णय देण्यात आला होता त्याला छेद देता आला असता. पण त्यावर काही निर्णय झाला नाही. आमच्या कर्तव्यानुसार आम्ही भूमिका मांडली आहे. कोणाला किती आरक्षण द्यायचे याची मागणी आम्ही केली नव्ही मात्र आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यासंदर्भात आम्ही मागणी केली असल्याचे खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचा मुखवटा फाडला गेला

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. संसदेत जी दुरुस्ती सुचवली होती. त्याला काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्षांसहित ७१ लोकांनी प्रतिसाद दिला आणि भाजप तसेच इतर अपक्षांनी विरोध केला आहे. खासकरुन रावसाहेब दानवे तिथं होते जे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करत होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप मराठा, धनगर समाजाला आरक्षण देणार असं बोलणारे रावसाहेब दानवे तोंड गप्प करुन बसले होते. त्यांच्यासोबत इतर भाजपचे सदस्य गप्प होते. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की तुम्ही कोणत्या तोंडाने मराठा आणि धनगर समाजाच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. कोणत्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रोव्हिजन या विधेयकामध्ये केली हे दाखवून देण्याची तयारी त्यांची असली पाहिजे होती. मात्र भाजपचा जो मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत खोटा मुखवटा होता तो फाडला गेला आहे. मराठा समाजाने, धनगर समाजाने भाजपच्या खोट्या मुखवट्यापासून सावध राहिले पाहिजे. असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -