घरताज्या घडामोडीनवी मुंबई विमानतळालगत बेकायदेशीर रेती उपसा सुरूच

नवी मुंबई विमानतळालगत बेकायदेशीर रेती उपसा सुरूच

Subscribe

विमानतळाच्या गाभा क्षेत्राला भविष्यात फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई विमानतळ गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा करण्यात येत आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरीता पनवेल,उरण परिसरातील खाडी किनारी असलेली जागा सिडकोने हस्तांतरित केली आहे. या विमानतळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भराव करुन नदीचा प्रवाह बदलण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ क्षेत्राला धोक्याची शक्यता आहे. सध्या विमानतळाचे काम बंद आहेत. हे काम बंद असले तरी विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या सुरक्षेकरिता सिडको प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु तरीही या गाभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ दिसून येते. खाडी पात्रात सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उपसा करणाऱ्यांची ही वाहने असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. रेती उपसा केल्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. खारफुटी नष्ट झाल्यामुळे खाडी किनाऱ्याची धूप होत आहे,त्यामुळे विमानतळाच्या गाभा क्षेत्राला भविष्यात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेतीच्या बेकायदेशीर उत्खननाविरोधात तहसीलदार कार्यालयामार्फत वारंवार कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली. अवजड वाहनांची विमानतळ गाभा क्षेत्रातील वर्दळ रोखण्यासाठी बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना तळेकर यांनी केल्या आहेत. या वारंवार होणाऱ्या रेती उपसाबाबत सिडकोकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

- Advertisement -

खारफुटी संवर्धन होणे गरजेचे, मात्र…

खारफुटी वाचविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे असून त्यासाठी एक खारफुटी समिती नेमण्यात आली आहे. सिडकोने हे खारफुटी क्षेत्र विकसित व्हावे यासाठी अधिकार क्षेत्रातील २८१ हेक्टर जमिनी वन विभागाला दिली आहे. खाडीकिनारी असलेल्या महामुंबईचे भरतीच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी हे क्षेत्र अधिक अधिक वाढविण्यासाठी खारफुटी समिती प्रयत्न करीत असताना नवी मुंबई भागात खारफुटीची कत्तल कायम सुरूच आहे.


हेही वाचा – राण्यांका गणपती पावलो, १७ सप्टेंबर पर्यंत कारवाई नको – कोर्टाचो आदेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -