घरताज्या घडामोडीLive Update: कर्नाटकात प्रवेशासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

Live Update: कर्नाटकात प्रवेशासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

Subscribe

महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे.


एसटी संपात मोठी फूट पडली असून आज १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर राज्यभरात २१६९ वाहक व २४६७ चालक कामावर हजर झाले असल्याचा दावा सरकारने केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५.३० वाजता आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच यामध्ये नव्या ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात चर्चा करणार आहेत.


बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघेजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकार आता सतर्क झालं आहे.

- Advertisement -

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीरला पुन्हा धमकी देण्यात आल्यामुळे घराजवळील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.


महाराष्ट्र सरकारला २ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु काही मुद्दे अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.


आशिष शेलार आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार


संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, लोकसभेत तीन कृषी कायदे रद्दबातल करण्यासंबंधीचं विधेयक मांडण्यात येणार.


मी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांनी सरकारला पाठिंबा दिला! आणखी कितीही संकटे आली तरी राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत राहील, असे ट्विट राज्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


 

पंतप्रधान मोदी आज मन की बातमधून साधणार जनतेशी संवाद

मुख्यमंत्र्यांची आज सर्व विभागांसोबत बैठक होणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शाळांविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे. मुख्यमंत्री आजच्या बैठकीत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


संसदेची आज सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत बैठकीला हजर राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -