घरताज्या घडामोडीKamada Ekadashi 2022: आज कामदा एकादशी निमित्ताने वाचा 'ही' व्रत कथा, पापांपासून...

Kamada Ekadashi 2022: आज कामदा एकादशी निमित्ताने वाचा ‘ही’ व्रत कथा, पापांपासून मिळते मुक्ती

Subscribe

आज, १२ एप्रिलला कामदा एकादशी व्रत (Kamada Ekadashi) केले जाते. हे व्रत ठेवल्याने पाप आणि कष्ट नाहीसे होते, असे म्हटले जाते. भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि मनोकामना पूर्ण होते. जे लोक व्रत ठेवतात, त्यांनी कामदा एकादशीची व्रत कथा आवश्य पठन केली पाहिजे. जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही व्रत कथा पठन करू शकत नसाल, तर ती ऐकावी. असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते. आज आपण कामदा एकादशी व्रत कथाबाबत जाणून घेऊया.

कामदा एकादशी व्रत कथा

एकेदिवशी धर्मराज युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल विचारले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, ‘चैत्र शुक्ल एकादशी व्रताला कामदा एकादशी म्हटले जाते. हे व्रत केल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते.’

- Advertisement -

प्राचीन काळात एक भोगीपूर राज्य होते, ज्याचा राजा पुंडरीका होता. त्याला संपत्ती आणि ऐश्वर्य लाभले होते. राज्यात ललित आणि ललिता नावाचे स्त्री आणि पुरुष होते. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एकदा ललित राजा पुंडरीकच्या सभेत इतर कलाकारांसोबत गाणं गात होता, त्यादरम्यान ललिताला पाहून त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याचे स्वर बिघडले. जेव्हा राजा पुंडरीकला ही गोष्ट समजली तेव्हा ललितला मनुष्याला आणि कच्चे मांस खाणारा राक्षस बनण्याचा शाप दिला. त्यामुळे ललित एक राक्षस झाला. त्याचे जीवन कष्टकरीसारखे झाले. तो जंगलात राहू लागला. दुसरीकडे पत्नी ललिता खूप दुःखी झाली होती. ती सतत ललिताच्या मागे मागे धावत असायची.

एकेदिवशी ललिता फिरत फिरत विंध्याचल पर्वतावरील श्रृंगी ऋषींच्या आश्रमात गेली. मग तिने तिथे मुनिवर यांच्याकडे प्रार्थना केली. श्रृंगी ऋषींनी तिला आश्रमात येण्याचे कारण विचारले. त्यावेळेस तिने सर्व काही सांगितले. तेव्हा श्रृंगी ऋषी म्हणाले की, ‘तू कामदा एकादशीचे व्रत कर आणि त्याचे पुण्य आपल्या पतीला दे. तो लवकरच राक्षस योनीतून मुक्त होईल.’

- Advertisement -

त्यानंतर ललिताने चैत्र शुक्ल एकादशी व्रत केले आणि पुढील दिवशी द्वादशी पार करून व्रत पूर्ण केले. मग तिने देवाकडे प्रार्थना केली की, ती या व्रताचे पुण्य आपल्या पती देऊ इच्छिते. जेणेकरून तो राक्षस योनीतून मुक्त होईल. भगवान विष्णूच्या कृपेने पति ललित राक्षस योनीतून मुक्त झाला. पूर्वीप्रमाणे दोघे राहू लागले आणि एकेदिवशी विमानावर बसून स्वर्ग लोकात गेले.


हेही वाचा – जाणून घ्या ; उपवास करण्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -