घरताज्या घडामोडीKrishna Janmashtami 2021: राशीनुसार बाळकृष्णाला कोणते वस्त्र अर्पण कराल, जाणून घ्या

Krishna Janmashtami 2021: राशीनुसार बाळकृष्णाला कोणते वस्त्र अर्पण कराल, जाणून घ्या

Subscribe

बाळकृष्णासाठी सुंदर पाळणा तयार केला जातो. बाळकृष्णाला पाळण्यात घालण्याआधी त्याला सजवले जाते. सुंदर वस्त्र परिधान केले जातात.

आज कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवस. (Krishna Janmashtami 2021) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवसाला हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी रात्री बारा वाजता श्री कृष्णाला जन्म झाला असे मानतात त्यामुळे श्री कृष्णाची विधीवत पुजा केली जाते. बाळकृष्णासाठी सुंदर पाळणा तयार केला जातो. बाळकृष्णाला पाळण्यात घालण्याआधी त्याला सजवले जाते. सुंदर वस्त्र परिधान केले जातात. आपल्या राशीनुसार श्री कृष्णाला कोणते वस्त्र अर्पण करायचे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा जाणून घ्या. त्याचप्रमाणे कोणते मंत्रपठण करायचे हे माहिती करुन घ्या.

मेष

मेष राशीच्या लोकांनी बाळ कृष्णाला लाल रंगाची वस्त्र अर्पण करावी. त्याचप्रमाणे कुंक वाहून ऊँ कमलनाथाय नम: मंत्र म्हणावा. दह्याचा नैवेद्य दाखवावा.

- Advertisement -

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला चांदीचे वर्क असलेले दागिने घालावेच आणि सफेद चंदनाचा टिळा लावावा. तसेच श्रीकृष्णाष्टकचा जप करावा. त्याचप्रमाणे दही किंवा रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवावा.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना बाळकृष्णाला लहेरिया असलेली वस्त्र अर्पण करावी. त्याचप्रमाणे चंदनाचा टिळा लावून ऊँ गोविंदाय नम: मंत्र म्हणावा. या राशीच्या लोकांनी बाळकृष्णाला दह्याचा नैवेद्य दाखवावा.

- Advertisement -

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी कृष्णाला सफेद रंगाचे वस्त्र अर्पण करुन दूधाचा नैवेद्य दाखवून राधाष्टक मंत्र म्हणावा.

सिंह

या राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करुन अष्टगंधाचा टिळा लावावा. त्याचप्रमाणे ऊँ कोटी सूर्य संप्रयाय नम: मंत्र म्हणून. दही,पंच मेवा आणि बेलाचे फळ अर्पण करुन नैवेद्य दाखवावा.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करुन माव्याची बर्फी,केसर दूधाचा नैवेद्य दाखवून ऊँ देवकीनंदनाय नम: मंत्र म्हणावा.

तुळ

तुळ राशीच्या लोकांनी बाळ कृष्णाला केशरी रंगाची वस्त्र अर्पण करावी. त्याचप्रमाणे ऊँ लीलाधघराय नम: या मंत्र म्हणून दह्याचा नैवेद्य दाखवावा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करुन मिल्क केकचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ बराहाय नम: मंत्र म्हणावा.

धनु 

धनु राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करुन बदाम हलव्याचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्र म्हणावा.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर खसखस आणि धने एकत्र करुन त्याचा नैवेद्य दाखवावा. या राशीच्या व्यक्तींनी ऊँ नमो कृष्ण वल्लभाय नम: मंत्र म्हणावा.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनी बाळकृष्णाला निळ्या रंगाची वस्त्र आणि बालूशाहीचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ नमो कृष्ण वल्लभाय नम: मंत्र म्हणावा.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी पिंताबरी रंगाची वस्त्र बाळकृष्णाला परिधान करावी. तसेच केशर बर्फी,जिलेबी किंवा केळ्याचा नैवेद्य दाखवून ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणावा.


हेही वाचा – Shravan 2021: श्रावणात येणारे सण आणि श्रावण महिन्याचे महत्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -