घरताज्या घडामोडीmaharashtra landslide: सिंधुदुर्गातही दरड कोसळून महिलेचा मृत्यू, राज्यात पावसाचे ७० हून अधिक...

maharashtra landslide: सिंधुदुर्गातही दरड कोसळून महिलेचा मृत्यू, राज्यात पावसाचे ७० हून अधिक मृत्यू

Subscribe

पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले असून आज रायगड आणि साताऱ्यानंतर सिंधुदुर्गातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले असून आज रायगड आणि साताऱ्यानंतर सिंधुदुर्गातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड व साताऱ्यातील दरड कोसळण्याच्या घटनेत आतापर्यंत ५० हून अधिक मृत्यू झाले आहेत. रायगड जिल्हयातील तळीये येथे ३५ घरांवर दरड कोसळल्याने ३८ जणांना प्राण गमवावे लागले तर साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळल्याने १२ जणांचा जीव गेला. तर सिंधुदुर्गातील कणकवली-दिगवळे येथे घरावर दरड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

तर रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेल, सुतारवाडी येथे भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला. तर चिपळूणमधील कोवीड सेंटरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने वीज यंत्रणा ठप्प झाली. यामुळे व्हेंटीलेटरवर असलेले ११ जण दगावले आहेत. यामुळे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ७० वर गेली आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गातील कणकवली दिगवळे येथे घरावर दरड कोसळल्याने संगिता जाधव (४२) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती प्रकाश जाधव याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -