घरताज्या घडामोडीपनवेलमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी

पनवेलमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी

Subscribe

गणेशोत्सव पुर्वतयारीसाठी पनवेल महापालिका, शासकिय विभाग आणि गणेश मंडळे यांची बैठक

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने गणेशोत्सव पुर्वतयारीसाठी पनवेल महापालिका, शासकिय विभाग आणि गणेश मंडळे यांची बैठक पार पडली. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. महानगरपालिकेने खास गणेशोत्सवासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी बनविलेल्या ऑनलाईन अर्जाचे प्रेझेंटेशन यावेळी करण्यात आले. Smartpmc.in या संकेतस्थळावर जाऊन गणेश मंडळांनी आपले रजिस्ट्रेशन करावे असे, पालिकेच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

आपण आपल्या भावनांना आवर घालून कमीत कमी गर्दी करण्याचा प्रयत्न करा. गणेश उत्सव सुरक्षित आणि काळजी घेऊन साजरा करू या असे प्रतिपादन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या पूर्व नियोजनाच्या बैठकीत केले.  परेश ठाकूर म्हणाले कोरेानाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी गणेश विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता घरच्या घरी किंवा विसर्जनासाठी खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करावे. विसर्जनावेळी कमीत कमी गर्दी करावी.

- Advertisement -

सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत यांनी गणेशोत्सवासाठी शासनाने दिलेले नियम सर्वांना सांगितले. उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवाकरिता महानगरपालिका, पोलिस विभाग, ट्राफीक पेालीस यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. यापुढे येणारे दहीहंडी व गणेशोत्सव सण शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास पोलिस विभाग, वीज मंडळ, महानगरपालिका अधिकारी,कर्मचारी, सिडको अधिकारी, पनवेल कार्यक्षेत्रातील विविध गणोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेकडून निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठया प्रमाणवर सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरोनाकाळातील साजरे होणारे सण हे सर्व कोविड नियम पाळून अगदी साधेपणाणे व सामाजिक भावनेने साजरे होत आहेत. त्यात  गणेशोत्सव हा सण सुद्धा अपवाद नाही.त्यामुळे हा गणेशोत्सव साधेपणाणे सामजिक भान व पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत निर्मल गणेशोत्सव स्पर्धा सम्पूर्ण रायगड जिल्ह्यासाठी घेऊन येत आहे.


हे ही वाचा – kabul airport attack: अफगाणिस्तानातील घटनेने महिलांसह लहान मुलींवर सर्वाधिक परिणाम – इस्राईल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -