घरताज्या घडामोडीमुंबई-मांडवा लाँचसेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणार

मुंबई-मांडवा लाँचसेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणार

Subscribe

अलिबाग ते मुंबई हा अवघ्या अडीच ते तीन तासांचा प्रवास असला तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे याच प्रवासाला ४ ते ५ तास लागत आहेत.

असह्य, जीवघेण्या खड्ड्यांतून पनवेल मार्गे मुंबई आणि तेथून परत असा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर.. अनेकांची नजर लागून असलेली मुंबई-मांडवा जलवाहतूक सेवा बुधवार, १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी ८.३० आणि दुपारी ३.३० या वेळेत मालदार कंपनीची ही लाँच सेवा सुरू होत आहे.

पावसाळ्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात येणारी मांडवा-मुंबई जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होते. त्यानुसार सकाळी ८.३०, तसेच दुपारी ३.३० या दोन वेळेत सदर लाँच सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती मालदार कंपनीच्या सूत्रांनी दिली. सध्या खड्ड्यांतून रस्ता शोधण्याची वेळ जागोजागी येत असल्याने वाहन प्रवास नकोसा झाला आहे. अलिबाग ते मुंबई हा अवघ्या अडीच ते तीन तासांचा प्रवास असला तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे याच प्रवासाला ४ ते ५ तास लागत आहेत. त्यात वाहतूक कोंडी झाली तर नियोजित स्थळी पोहचण्याची वेळ अनिश्चित होत असल्याने प्रवाशांचे हाल होतात.

- Advertisement -

मुंबईतून अलिबागकडे किंवा येथून मुंबईत व्यवसाय, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना जलवाहतूक सोयीची ठरते. मुंबईतून येणारे पर्यटक लाँच प्रवासाला प्राधान्य देत असतात. मात्र पावसाळ्यात ही वाहतूक बंद झाल्यानंतर रस्त्याच्या प्रवासाशिवाय मार्ग नसतो. लाँच सेवेला कोरोना महामारीचाही फटका बसला आहे. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे लाँच वाहतूक सुरू होत असल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.


हे ही वाचा – धारावीत सिलेंडरचा स्फोट, १५ जणांची प्रकृती गंभीर; बचावकार्य सुरू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -