Sant Namdev : नामदेव महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट व्हावे – पुरुषोत्तम मुळे

समाधी दिनी शासकीय सुट्टी शासनाने जाहीर करावी

Namdev Maharaj's name should be included in the list of great men
नामदेव महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट व्हावे - पुरुषोत्तम मुळे

संपूर्ण हिंदूस्तानात पायी चालत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत समान समाज प्रबोधन करीत ७५० वर्षापूर्वी समाजाला उत्तम दिशा देणारे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करून संजीवनी समाधी दिनी शासकीय सुट्टी शासनाने जाहीर करावी, अशी मागणी रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघाचे अध्यक्ष तथा कोकण विभागाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी व्यक्त केले. जिल्हा शिंपी समाज महासंघ आणि येथील श्री देव राधा-कृष्ण नामदेव शिंपी समाज संस्था आयोजित समाजामधील इयत्ता १० वी, तसेच १२ वीमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा आणि ऑनलाईन वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अ. भा. नामदेव समाज उन्नती परिषदेचे विश्वस्त अ‍ॅड. ज्ञानेश्वर पाटसकर, अध्यक्ष संदीप लचके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सुभाष मुळे, नामदेव हितवर्धक मासिकाचे कार्यकारी सदस्य सुनील पोरे, तालुका नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष महेंद्र कसबजे उपस्थित होते.

शिंपी समाजाचा आर्थिक विकास करण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे संत नामदेव आर्थिक विकास महामंडळाची मागणी करावी, असेही मुळे यांनी सूचित केले. अ‍ॅड. पाटसकर यांनी परिषदेच्या कामाचा आढावा घेताना राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


हे ही वाचा – संत शिरोमणी नामदेव महाराज