घरताज्या घडामोडीसीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

Subscribe

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात सीताफळ खूप असतात. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या या फळामध्ये खूप साऱ्या बिया असतात. सीताफळाचा सुगंध खूप छान असतो. काही जणांना सीताफळात बिया जास्त असल्यामुळे खायला कंटाळा येतो. मात्र पिकलेले सीताफळ खाण्याची मज्जा काही औरच असते. सीताफळाचे बरेच आरोग्यादायी फायदे आहेत. सीताफळात भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. जसे सीताफळाचे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे सीताफळ खाण्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत? ते जाणून घ्या..

सीताफळाचे फायदे

- Advertisement -
  • सीताफळमध्ये अनेक अँटीऑक्सीडेंट असतात. एसिमिसीन आणि बुलाटासिस नावाचे अँटीऑक्सीडेंट सीताफळमध्ये असून हे कँन्सर विरोधी गुणधर्म आहेत. हे अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला प्रदूषणास लढण्यास मदत करतात.
  • एक सीताफळ खाल्ल्यामुळे दररोज १० टक्के पोटॅशिअम आणि ६ टक्के मॅग्निशिअमची गरज पूर्ण होते. हे दोन्ही रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात. तसेच सीताफळ हदयरोगापासून संरक्षण करते.
  • सीतफळ फायबरसाठी चांगला स्रोत आहे. यामध्ये सोल्यूएबल आणि इनसोल्यूएबल दोन्ही फायबर असतात जे पचन करण्यात मदत करतात. बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांसाठी सीताफळ हे एक चांगले फळ आहे.

सीताफळाचे तोटे

  • सीताफळामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले, तर सूज येऊ शकते. तसेच फायबर जास्त असल्यामुळे जुलाब होऊ शकतात, ज्यामुळे उलट्या देखील होऊ शकतात.
  • सीताफळाच्या बिया विषारी असतात, ज्या त्वचा आणि डोळ्यांसाठी वाईट असतात. अभ्यासानुसार, सीताफळाच्या बियांची पावडर वापरल्यामुळे त्वचेवर वेदना होणे आणि त्वचा लालसर होऊ शकतो. तसेच यामुळे गंभीर डोळ्यांची समस्या होऊ शकते.
  • सीताफळमध्ये खूप कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तसेच यात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त सीताफळ खाऊ नका. मधुमेह रुग्णांनी हे फळ खाऊ नका, कारण सीताफळामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
  • जर तुम्ही आधीपासून कोणतेही औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हेही वाचा – जीव घेऊ शकतो दूधीचा ज्यूस

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -