घरताज्या घडामोडीकर्जतच्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव

कर्जतच्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव

Subscribe

नाव देण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केला

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून व नगरसेवक संकेत भासे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांकरता जवळपास ७ कोटी रुपयाचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मंजूर झाला आहे . या कामांमध्ये कर्जतच्या सौंदर्याच्या दृष्टीकोनातून काही विकासकामे होणार असून त्यात प्रामुख्याने कर्जत नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेश द्वाराकरिता ७९ लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला आहे . प्रवेशद्वार पूर्ण झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रभूषण डॉ . नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केला असल्याने त्यांनी या संदर्भात सचिन धर्माधिकारी यांची भेट घेतली.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य तसेच अप्पासाहेब आणि दादासाहेब करत असलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य समजून मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यासंदर्भातील निवेदनआमदार महेंद्र थोरवे यांनी सचिन धर्माधिकारी यांची भेटली . त्यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे , नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे उपस्थित होते.

- Advertisement -

आदरणीव महाराष्ट्रभूषण तिर्थरुप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर, संपूर्ण देशभरासह जगातील अनेक देशात समाजप्रबोधनाच्या माध्यमातून असंख्य मानव जातीला एका चांगल्या मार्गाची दिशा दिली आहे. त्यामुळे कर्जतच्या प्रवेशाव्दाराला त्यांचे नाव लागल्यास आम्हा सर्व कर्जतकरांना विशेष आनंद होईल, असे कर्जतचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.


हेही वाचा – राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -