घरक्राइमExtortion case : परमबीर सिंह भारत सोडून युरोपात पोहचले ? NIA ला...

Extortion case : परमबीर सिंह भारत सोडून युरोपात पोहचले ? NIA ला संशय

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी भारत देश सोडल्याचा संशय तपास यंत्रणांना आता येऊ लागला आहे. अटकेच्या भीतीनेच त्यांनी भारतातून पळ काढल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA) मार्फत बजावण्यात येणाऱ्या समन्स त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्यानेच तपास यंत्रणांनी ही भीती व्यक्त केली आहे. आतापर्यंत एनआयएने पाठवलेले एकही समन्स परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहचले नसल्याची बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. मुंबई पोलिसांचेही समन्स न पोहचल्याने या प्रकरणात आणखी संशयासाठी वाव निर्माण झाला आहे. दरम्यान ठाणे न्यायालयानेही खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेले परमबीर सिंह कुठे आहेत ? असा सवाल केला आहे. (Parambir singh may left India due to fear of arrest in extortion case NIA summons not reachable )

तपास यंत्रणांकडून परमबीर सिंह यांचा शोध हा रोहतक तसेच छत्तीसगड याठिकाणी सुरू आहे. एनआयएने याठिकाणी शोध घेतल्यानंतरही परमबीर सिंह सापडले नसल्याची माहिती आहे. त्यांनी युरोपातील देश गाठला असावा असा दाट संशय तपास यंत्रणांना आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी तसेच एनआयए अशा दोन्ही यंत्रणांकडून परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

परबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सिंह यांच्याबद्दल माहिती नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी न्यायालयानेही खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी परमबीर सिंह कुठे आहेत ? असा सवाल ठाणे सत्र न्यायालयाने केला आहे. खंडणी प्रकरणातील सहआरोपी हे ५० दिवसांपासून कारागृहात आहेत. त्यामुळेच त्यांची जामीनावर सुटका करण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली होती. ठाण्याचे सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी सुनिल जैन आणि संजय पुनामिया या आरोपींची बुधवारी जामीनावर सुटका केली. पुनामिया आणि जैन यांना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या, परदेशात न जाण्याच्या अटीवर एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीचे आरोप कोणते ?

परबीर सिंह यांच्यासह तत्कालीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणोरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर अशा पाच जणांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात चार कोटी ६८ लाखांच्या खंडणी प्रकरणात २४ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तर ठाण्यातही परमबीर सिंह यांच्यासह असाच गुन्हा २९ जणांविरोधात दाखल झाला आहे. सुनिल जैन आणि संजय पुनामिया यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यापाठोपाठ कोपरी पोलिसांनी अटक केली होती. मुंबई, ठाण्यात तीन ठिकाणी परमबीर सिंह यांच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

हेही वाचा – परमबीर यांच्या निलंबनाची तयारी महासंचालकांचा अहवाल गृहविभागाकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -