Manipur Election Results 2022: मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह विजयी; पुन्हा राज्यात भाजपचा भगवा फडकणार

Manipur Election Results 2022 CM N Biren Singh wins from Heingang seat
Manipur Election Results 2022: मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह विजयी; पुन्हा राज्यात भाजपचा भगवा फडकणार

मणिपूरच्या हिंगांग विधानसभेच्या जागेवरून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना जनतेने भरभरून मत देऊन विजय केले आहे. यंदा हिंगांग जागेवरून तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला नव्हता. दोन उमेदवारांमध्ये लढत होती. त्यामध्ये एक म्हणजे बिरेन सिंह आणि दुसरे काँग्रेसचे शरतचंद्र सिंह या दोघांमध्ये लढत होती. बिरेन सिंह हे 24 हजार 814 मतांनी विजयी झाले असून शरतचंद्र सिंह 6 हजार 543 मतांनी पराभूत झाले आहेत. यापूर्वीही बिरेन सिंह यांनी शरतचंद्र सिंह यांना पराभूत केले होते. 2022च्या या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भगवा फडकणार आहे. पण आता भाजप पुन्हा एकदा बिरेन सिंह यांना मुख्यमंत्री पद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून मणिपूरमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाली होती. तेव्हापासून भाजप आघाडीवर होते. तसेच बिरेन सिंह देखील शरतचंद्र सिंह यांच्या मताच्या तुलनेत पुढे होते. मणिपूरमधील 60 जागांवर मतमोजणी सुरू असून बहुमत मिळण्यासाठी ७१ जागांची आवश्यकता आहे. अशातच भाजपने ३१ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसची अत्यंत वाईट प्रकारे हार झाली आहे. काँग्रेसला अपक्षांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत 60 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस जिंकली होती. परंतु 21 जागी आघाडीवर असलेल्या भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि नगा पीपल्स फ्रंट(NPF) सारखे पक्ष एकत्र घेऊन सरकार स्थापन केले होते. सध्याचा निकाल आल्यानंतर एनपीपी आणि एनपीएफसारखे दल भाजपसोबत पुन्हा जाऊ शकतात. यंदा या दोन्ही पक्षांनी निवडणूक भाजपसोबत न लढता वेगवेगळी लढली.

2007 मध्ये बिरेन सिंह हिंगांगमधून आमदार म्हणून निवडून आले होते आणि मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. 2016 साली एन. बिरेन सिंह काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. पहिल्यांदा या जागेवर 2002 मध्ये डेमोक्रेटिक रिव्हॉल्यूशनरी पीपल्स पार्टीचे उमेदवा म्हणून बिरेन सिंह निवडणूक लढले होते. त्यानंतर आमदार झाले आणि सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2007 साली काँग्रेसचे आमदार झाले. मग 2012 मध्ये बिरेन सिंह दुसऱ्यांदा या जागेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. 2017 साली बिरेन सिंह भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडले. त्यांची ही पाचवी निवडणूक आहे.


हेही वाचा – Manipur Election Result 2022: भाजप, कॉंग्रेसपेक्षा RPI ठरला भारी! तरीही अपक्षाने मारली बाजी