घरताज्या घडामोडीरणवीर-दीपिकाचा '८३' मधला फर्स्ट लूक पाहीलात का ?

रणवीर-दीपिकाचा ‘८३’ मधला फर्स्ट लूक पाहीलात का ?

Subscribe

बॉलीवूडमधील लविंग कपल असलेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा ८३ या चित्रपटातील लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ८३ हा चित्रपट ज्येष्ठ माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनपटावर आधारित असून यात रणवीर कपिल यांची भूमिका करत असून त्यांच्या पत्नी रोमीची भूमिका दिपिका करत आहे. त्यांचा या चित्रपटातील लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने दिपिका भलतीच खुश असून ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे तिने म्हटले आहे. एका महत्वाकांशी पतीच्या आयुष्यात पत्नीची भूमिका किती महत्वाची असते हे मी माझ्या आईमध्ये बघितले आहे. यामुळे ८३ हा चित्रपट त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे जी स्वताचे स्वप्नांपेक्षा पतीच्या स्वप्नांना अधिक महत्व देते.

- Advertisement -

कबीर खान फिल्मच्या या चित्रपटाचे निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम आहे. दिपिका पदुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला हे ८३ चित्रपटाचे निर्माते आहेत. १० एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू भाषेत तो रिलिज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Deepika Padukone and Ranveer Singh as Romi and Kapil Dev in @83thefilm ?? @deepikapadukone #DeepikaPadukone #DeepikaPCrazens

A post shared by Deepika Padukone (@deepikapcrazens) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -