घरक्राइमगर्भवतीने ऑपरेशन दरम्यानच जीव सोडला, अंत्यसंस्कारानंतर अस्थीमध्ये कैची सापडल्याने खळबळ

गर्भवतीने ऑपरेशन दरम्यानच जीव सोडला, अंत्यसंस्कारानंतर अस्थीमध्ये कैची सापडल्याने खळबळ

Subscribe

पंजाबमधील मोगा सरकारी रुग्णालयात फर्शीवर झालेल्या डिलीव्हरी प्रकरणाचा तपास सुरू असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील जवळच असलेल्या बुढसिंह वाला या गावच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वास्तविक, महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थी घेण्याच्यावेळी राखेत १ कैची आणि ऑपरेशन करण्यासाठी वापरली जाणारे काही साहित्य सापडले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. एकीकडे महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी हलर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे डॉक्टर हा आरोप फेटाळून लावत आहेत.

- Advertisement -

संबंधित ठाणे सिटी शहर दक्षिणच्या पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणाचा अहवाल मागविला आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘कुटुंबियांना सापडलेली कैची ताब्यात घेतील असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागितला आहे.’

- Advertisement -

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सिमरत कौर खोसा यांनी सांगितले की, ‘६ तारखेला ही मुलगी त्यांच्याकडे आली आणि रविवारी सकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला फरीदकोटला हलवण्यात आले. तिथेच तिचा मृत्यू झाला. तिथेल्या डॉक्टरांशी बोलणे झाले असून त्यांनी सांगितले की, पूर्ण पोट तपासले गेले आहेत. ज्या व्हिडिओमध्ये कैची दाखवण्यात आली आहे, ती सरकारी रुग्णालयातील स्टॉकमध्ये नाही आहे. याची चौकशी झाली पाहिजे.’

या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी मोगा येथील सरकारी रुग्णालयात मोठे ऑपरेशन करून प्रसूती झाली, त्यानंतर त्या महिलेची प्रकृती खालवली आणि तिला फरीदकोट येथे हलवण्यात आले आणि मग तिथे तिचा मृत्यू झाला.


हेही वाचा – कब्र खोदून मृतदेहाच्या डोक्यावरून केस चोरी करणारे पाच जण गजाआड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -