घरताज्या घडामोडीshrivardhan : खंडित वीज पुरवठ्याने श्रीवर्धनकर हैराण

shrivardhan : खंडित वीज पुरवठ्याने श्रीवर्धनकर हैराण

Subscribe

वितरणाच्या नावाने रहिवाशांचा शिमगा

शहरात उष्णतेने उच्चांक गाठलेला असताना महावितरणकडून वारंवार खंडित केल्या जाणार्‍या वीज पुरवठ्याने श्रीवर्धनकर हैराण झाले आहेत. जणू भारनियमनाचा नजराणा दिला जात असल्यागत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने पर्यटनाच्या मोसमात येथील नागरिक महावितरणच्या विरोधात शिमगा करत आहे. तांत्रिक बिघाडाच्या निमित्ताने तासंतास वीज पुरवठा बंद करण्याच्या प्रकाराने जनतेत उद्रेकी  भावना निर्माण झाली आहे.

कोरोनाचे निर्बंध उठल्यापासून शहरात पर्यटन वाढले आहे. हॉटेल,रेस्टॉरंट, लॉजमध्ये इनव्हर्टर,जनरेटर ह्या सुविधा असल्यातरी काही तास वीजपुरवठा खंडित झाला की याही  सुविधा अपुर्‍या पडतात. शहरात आल्यावर सायंकाळी समुद्रावर व गावात रपेट मारणे हा पर्यटकांचा आवडता कार्यक्रम.काही वेळा योगायोगाने सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पर्यटक गोंधळून जातात.निसर्ग चक्रिवादळात महावितरणचे ट्रान्सफार्मर,पोल, वायर्स या सामुग्रीची पडझड झाल्यामुळे खुपच नुकसान झाले होते.परंतु, त्यानंतर सर्व उपकरणे नवीन बसवण्यात आल्यावर हा प्रकार कमी होईल, असे वाटत असताना उलटाच अनुभव लोकांना येत आहे.

- Advertisement -

महिन्यातून दोन ते तीन दिवस देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली वीज घालवली जाते. अधूनमधून खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे हॉटेल,लॉज यांचे नुकसान होतेच पण  झेरॉक्स, वेल्डींग उद्योग,आइस्क्रीम पार्लर या छोट्या व्यवसायीकांनाही भूर्दंड सोसावा लागतो आहे.

शहरात पर्यटन वाढले आहे. दीड वर्षानंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे. पर्यटक सुट्टीत आले की गाव बघण्यासाठी चार ते पाच दिवस राहतात.अधूनमधून जाणार्‍या विजेने त्यांचा हिरमोड होतो. काही दिवसांपूर्वी बारावीत शिकणारा रोशन चोगले हा विद्यार्थी रात्री फिरावयास बाहेर पडला.अचानक वीज गायब झाली आणि त्याच क्षणी त्याच्या पायाखाली आलेल्या सापाने त्याला दंश केला. यात या विद्यार्थ्याचा मृत्य झाला. वीज जाणार नाही, याची खबरदारी वितरण विभागाने घेतली पाहिजे.

- Advertisement -

फैसल हुर्जुक ,नगराध्यक्ष, श्रीवर्धन

काही वेळेला वीज चमकल्यावर इंन्सुलेटर निकामी होतो. निकामी झालेला इंन्सुलेटर बदलण्या शिवाय गत्यंतर नसते.त्यातच वादळी वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनींना लागतात व विद्युत पुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याचा कर्मचार्‍यांचा प्रयत्न असतो.

महेंद्र वाकपैंजन-उपकार्यकारी अभियंता महावितरण,श्रीवर्धन

 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -