घरक्राइमसंतापजनक! विद्यार्थिनींवर शिक्षकाचा अत्याचार, आरोपीला अटक

संतापजनक! विद्यार्थिनींवर शिक्षकाचा अत्याचार, आरोपीला अटक

Subscribe

तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेमच्या चिंतवारे येथील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिंनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेमच्या चिंतवारे येथील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिंनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणा हादरुन गेले आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेमच्या चिंतवारे येथील एका सरकारी शाळेतील पाच विद्यार्थिंनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी शिक्षकाने ऑगस्ट महिन्यात ६ ते १० वयोगटातील पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा शिक्षक आरोपी विद्यार्थिंनीना पॉर्न फिल्म दाखवायचा आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्या विद्यार्थिंनीना कपडे उतरवण्यास सांगायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. पण, याबाबत कोणालाही काही सांगायचे नाही, अशी दमदाटी देखील करायचा. आरोपीने मुलींमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्यांनी कोठेही या प्रकाराबद्दल वाच्यता केली नाही.

- Advertisement -

असा आला गुन्हा उघडकीस

दरम्यान, पीडित मुलगी आजारी पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितीला उपचाराकरता दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर पीडितीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबांना आणि डॉक्टरांना दिली. पीडित मुलीवर उपचार सुरु असताना हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी डोडा सुनील याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ऑगस्टपासून सुरु होता प्रकार

शिक्षकाकडून ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत मुलींवर अत्याचार सुरु होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी डोडा सुनीलविरोधात लक्ष्मीदेवपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी सोमशेखर शर्मा यांनी डोडा सुनील याला निलंबित केल्याची माहिती दिली आहे. पाच मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा; शस्त्राचा धाक दाखवत साडे तीन किलो सोनं लुटलं


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -