घरताज्या घडामोडीराज्यात थंडीचे आगमन

राज्यात थंडीचे आगमन

Subscribe

पुण्यात तापमान घसरले

उत्तरेत बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथून येणार्‍या थंड वार्‍याचा जोर वाढू लागला असून पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमान सरीसरीच्या तुलनेत घसरु लागले आहे. शहरात गुरुवारी किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली़ ते सरासरीच्या तुलनेत ०.७ अंशाने घटले आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा १३ दिवस लांबला. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला. पुण्यात ऑक्टोबर महिन्यात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तसेच एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस पडला. २८ ऑक्टोबरला मान्सून देशातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यावेळी पुण्यात कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३२.६ व १८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते़ ते सरासरीच्या तुलनेत २.५ अंशाने अधिक होते. त्यानंतर कमाल व किमान तापमानात घट होऊ लागली.

- Advertisement -

दिवसाच्या तापमानातही हळूहळू घट होऊ लागली असून सायंकाळ होताच थंड वार्‍याची झुळूक जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी कानटोपी, स्वेटर बाहेर काढल्याचे दिसून येऊ लागले आहे. पुढील दोन दिवसात शहरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमान ३१ व १५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -