ट्रम्प म्हणतात, ‘मी नंबर १, मोदी नंबर २’

ट्रम्प म्हणतात मी नंबर १, मोदी नंबर २. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर येणार आहेत.

Trump says I am number one, Modi is number two
ट्रम्प म्हणतात मी नंबर १, मोदी नंबर २

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर येणार आहेत. आपल्या भारत दौर्‍याबद्दल ते खूप उत्साही दिसत आहे. ते म्हणतात की, ‘भारतात जाणे हा माझा सन्मान आहे’. ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी आज एक ट्विट केले आहे. हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे. “फेसबुकवर मी पहिल्या क्रमांकावर तर दुसर्‍या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान मोदी आहेत. मी दोन आठवड्यांत भारतात जात आहे. मी याबद्दल उत्साहित आहे”, असे अध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी पंतप्रधान मोदींनी बुधवारी ट्विट केले होते की, ट्रम्प-मोदी भेटीमुळे दोन्ही देशांची मैत्री आणखी मजबूत होईल. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प २४-२५ फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत.  मेलानिया ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच २४ आणि २५ फेब्रुवारीला मी आणि ट्रम्प अहमदाबाद आणि नवी दिल्लीच्या प्रवासासाठी उत्सुक आहोत. भारत आणि अमेरिका यांच्यातील जवळच्या संबंधा बद्दलही मी उत्साहित आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.