Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम दुर्दैवी! मशिदीचा खांब कोसळून निष्पाप मुलांचा मृत्यू

दुर्दैवी! मशिदीचा खांब कोसळून निष्पाप मुलांचा मृत्यू

नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

Related Story

- Advertisement -

नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या घटनेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. (two innocent child death) मशिदीचा खांब अचानक कोसळल्याने खांबाच्या ढिगाऱ्याखाली तीन मुले अडकली गेली. ही घटना घडताच घटनास्थळी उपस्थितांनी धाव घेतली. पण, तत्पूर्वी दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील मोमीन नगर याठिकाणी असलेल्या मशिदीत नमाद अदा करण्यासाठी चिमुरडे गेले होते. नमाज करत असताना मशिदीचा खांब अचानक कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली तीन मुले अडकली. या मुलांचा आरडाओरड कानावर पडताच घटनास्थळी असलेल्या व्यक्तींनी धाव घेतली. त्यानंतर त्या तिन्ही मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि शामलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील दोन मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खुर्शीद (१२) आणि मतलूब (१२) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. तर या अपघातात सापडलेल्या तिसऱ्या मुलाचे नाव कलीम (१०) असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे.


- Advertisement -

हेही वाचा – पवार-शहांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय? संजय राऊतांचा सवाल


 

- Advertisement -