Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई उद्धव ठाकरेंचं सरकार पूर्णपणे अपयशी; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

उद्धव ठाकरेंचं सरकार पूर्णपणे अपयशी; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवासांपासून महाराष्ट्राचं राजकारण कित्येक गोष्टींवरून ढवळून निघाले असताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज २९ मार्च धुळवडीच्या निमित्ताने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय धुळवड सुरू असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, नारायण राणेंनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यावर चौफेर टीका करत ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचे देखील म्हटले आहे.

‘सचिन वाझे मनसुख हिरेन याची हत्या करतो. तरीही सचिन वाझेला अटक केली जात नव्हती, असं कोणतं प्रेम मुख्यमंत्र्यांना एका API बद्दल वाटते’, असे म्हणत नारायण राणेंनी प्रश्न उपस्थितीत केला. तसेच नारायण राणे पुढे असेही म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणतीही माहिती घेतली नाही. सचिन वाझे एन्काऊंटर करत होता, तो कोणाच्या सांगण्यावरून करत होता. ही माहितीदेखील मुख्यमंत्र्यांना नाही. त्यामुळे आज या सरकारला भोगावं लागतंय, असं संजय राऊत म्हणताय, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अपयशी आहे. त्यांना अनेक गोष्टींचं अज्ञान असल्याने अनेक निर्णय योग्य रितीने त्यांना घेता येत नसल्याने ते दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेत.’ असे म्हणत भाजप खासदार नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

यावेळी राणेंनी रविवारच्या सामना अग्रलेखात संजय राऊतांनी पहिल्यांदा सरकारच्या विरोधातील चूका नजरेसमोर आणल्यात. ज्या प्रकारे सचिन वाझेला पुन्हा एकदा पोलीस खात्यात घेतले त्याला पाठिंबा दिला, अशा आशयाचा हा लेख असून हा लेख ‘लेकी बोले सूने लागे’ असा असल्याचा खोचक टोला देखील राणेंनी यावेळी लगावला. यासह परमबीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरणाबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नसावं का? यासंदर्भातील सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांना माहित असून देखील ते गप्प का राहिलेत? असा सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थितीत केला.

कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात विकत मिळतोय

कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्रात सध्या भयावह परिस्थिती असून या राज्यात कायदा सुव्यवस्था विकत मिळतोय. निरपराध माणसांची हत्या होतेय, यामध्ये महिलांचा आकडा मोठा असल्याचे सांगत नारायण राणेंनी यावेळी चिंता देखील व्यक्त केली. महिलांना मारून टाकून त्यांनी आत्महत्या केली असं सागणं ही या सरकारची स्पॅशिलिटी आहे. यासह त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार, राज्यातील कोरोनाची अनियंत्रित परिस्थिती यावर देखील भाष्य केले.


- Advertisement -