घरताज्या घडामोडीVastu Tips For Car : घराचीच नाही तर वाहनाचीही वास्तू असली पाहिजे...

Vastu Tips For Car : घराचीच नाही तर वाहनाचीही वास्तू असली पाहिजे बरोबर ; जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Subscribe

वास्तू शास्त्र हे फक्त घरासाठी किंवा ऑफिसच्या वास्तूसाठीच नाही तर ते वाहनांच्या वास्तूसाठीसुद्धा असते. वास्तूशास्त्रानुसार गाडीमधील वास्तू चांगली असेल तर,त्यातून सकारात्मक ऊर्जा संचारते. त्याचप्रमाणे वाहनातील चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या वास्तूनुसार वास्तूमध्ये नकारात्मकता निर्माण होते. कारण कोणत्याही वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो.त्यामुळे सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणे आवश्यक असते. जर वाहनांच्या वास्तूमध्ये तुम्ही दुर्लक्ष दिले तर, वारंवार वाहनांचे नुकसान होते याशिवाय अपघातासारख्या सकारात्मक गोष्टीही घडण्यास सुरुवात होते.वास्तुशास्त्रामध्ये कारबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्ती नकारात्मकतेपासून दूर राहू शकते.

गाडीतील ‘या’ गोष्टी व्यवस्थित ठेवा

गाडीचा अपघात किंवा इतर नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी वाहनात तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवायला विसरु नका,असे वास्तुविशारदांचे मत आहे. गाडी वेळोवेळी स्वच्छ ठेवा. कारची खिडकी, कार्पेट आणि सीट नेहमी स्वच्छ ठेवा.जर या गोष्टी व्यवस्थित नसतील तर, व्यक्तीचे मन अस्वस्थ होते आणि योग्य निर्णय घेता येत नाही.अशुभ घटना  टाळण्यासाठी  शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहूनच वाहन खरेदी करा. त्याची पूजा करा जेणेकरून या सर्व नकारात्मक गोष्टी टाळता येतील. पण कारमध्ये काही शुभ गोष्टी ठेवणे देखील आवश्यक आहे. गाडीत देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.

- Advertisement -

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • गाडीच्या डॅशबोर्डवर वास्तूशास्त्रानुसार,गणपतीची मूर्ती ठेवणे गरजेचे असते.त्यामुळे तुमची सर्व विघ्न दूर होतील.
  • कारमध्ये लहान काळे कासव ठेवणे देखील फायदेशीर मानले जाते. हे वाहनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
  • वाहनात नैसर्गिक दगड किंवा स्फटिक ठेवल्याने पृथ्वी तत्व मजबूत होते. यामुळे कार नेहमी सुरक्षित राहते.
  • कारमध्ये चांगले संगीत वाजवणे, आवश्यक तेल ठेवणे यामुळे वाहनातील वातावरण प्रसन्न होते.
  • वास्तूनुसार वाहनात पाण्याची बाटली नेहमी ठेवावी. हे मन मजबूत करण्याचे काम करते आणि याच्या मदतीने व्यक्ती योग्य निर्णय घेते.

 


हे ही वाचा – Bird Flu Outbreak: केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रकोप, बदके आणि कोंबड्यांना मारण्याचे आदेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -