अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका; बोगस खत उत्पादक कंपनीवर होणार कारवाई

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. याबाबत आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

Action will be taken against bogus fertilizer manufacturing company

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. याबाबत आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (ता. १६ मार्च) विधान परिषदेच्या सभागृहात केली. विश्व खत उत्पादक संघटनेने नांदेड येथील श्री महाराष्ट्र फर्टीलायझर्स अँड केमिकल या महाउद्योग ब्रँड कंपनीने बोगस खत उत्पादक करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी कृषी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यावर कारवाई न करता उत्पादकावर कारवाई करू नये, असा दबाव कृषिमंत्री यांच्या स्वीय सहायक यांनी टाकल्याची माहिती मिळाल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून सभागृहात सांगण्यात आले. तर या प्रकरणावर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पुरावे दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.

बोगस खताची किंमत १२ हजार प्रति टन तर सरकारच्या खताची किंमत २२ हजार ५०० रुपये इतकी आहे. याबाबत तफावत का? खताचे दर १२ हजार करण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी आज सभागृहात उपस्थित केला. ज्यावर कृषीमंत्र्यानी कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच नांदेडच्या बोगस खत उत्पादक कंपनीला नोटीस देण्यात आली आहे आणि या कंपनीची चौकशी सुरू असल्याचे सुद्धा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून विधान परिषदेच्या सभागृहात देण्यात आली.


हेही वाचा – ‘या’ शेतकऱ्याने अद्रकची शेती करून, अवघ्या २ एकर शेतात मिळवले ‘इतक्या’ लाखांचे उत्पन्न