घरCORONA UPDATEनवी मुंबई मनपा क्षेत्रात आणखी १७ कोविड लसीकरण केंद्र !

नवी मुंबई मनपा क्षेत्रात आणखी १७ कोविड लसीकरण केंद्र !

Subscribe

३० जुलै रोजी ९१ केंद्रांवर होणार लसीकरण !

कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. नागरिकांना विनात्रास घरापासून जवळच लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार लसीकरण केंद्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये शुक्रवार ३० जुलै रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीचा पहिला डोस उपलब्ध असून नागरिकांना अधिक सुविधाजनक व्हावे याकरिता महानगरपालिकेच्या विद्यमान ७४ लसीकरण केंद्रांमध्ये १७ केंद्रांची वाढ करण्यात आलेली आहे. उद्या एकूण ९१ लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. या वाढीव १७ लसीकरण केंद्रांमध्ये १० शाळा, २ समाजमंदिर, ३ ज्येष्ठ नागरिक केंद्रे तसेच १ रात्र निवारा केंद्र व १ आर्ट ऑफ लिव्हींग केंद्र यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सदर लसीकरणाचा तपशील महानगरपालिकेच्या सर्व सोशल मिडीया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेला असून अद्याप लसीचा पहिला डोस न घेतलेल्या ४५ वर्षावरील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे असे कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन ही आपली सवय करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -