घरमुंबईShivsena Dasara Melava : शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, शिंदे गटाची...

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, शिंदे गटाची माघार; काय आहे कारण?

Subscribe

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दादर येथील शिवाजी पार्कात दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा हे समीकरण सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी जुलै 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर सध्या शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षीही शिंदे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र गेल्या वर्षी शिंदे गटाने बीकेसीमध्ये आपला दसरा मेळावा घेतला. त्यानंतर यंदाही दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणत्या गटाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला असताना शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतला आहे. दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Shivsena Dasara Melava Uddhav Thackerays voice will ring in Shivaji Park Shinde group retreat What is the reason Eknath Shinde Deepak Kesarkar)

हेही वाचा – दसरा मेळावा : शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गट आक्रमक; परवानगी द्या नाही तर आता…

- Advertisement -

दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी खुशाल काँग्रेसच्या नेत्यांना बोलवावे, शरद पवारांना बोलवावे आणि दसरा मेळावा साजरा करावा. परंतु दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असतो. केवळ विचार सोडायचे आणि मेळावा साजरा करायचा यामध्ये काही अयोग्य आहे, असं मला वाटत नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होणार असे सांगताना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांना आपण कधीच रोखलेलं नाही. आमचा मेळावा क्रॉस किंवा ऑव्हल मैदानावर होणार आहे, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊतांचा दीपक केसरकरांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले – “शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून…”

दरम्यान, यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळावं यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा पेच निर्माण झाला होता. पण, आता हा प्रश्न सुटला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -