घरक्राइमCrime News : आमीर खान डिपफेक व्हिडीओप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Crime News : आमीर खान डिपफेक व्हिडीओप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Subscribe

सिनेअभिनेता आमीर खान याच्या डिपफेक व्हिडीओप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमीरच्या प्रवक्ताच्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई : सिनेअभिनेता आमीर खान याच्या डिपफेक व्हिडीओप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमीरच्या प्रवक्ताच्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered Aamir Khan deepfake)

काही वर्षांपूर्वी आमीर खानचा एका खाजगी वाहिनीवर कार्यक्रम दाखविला जात होता. या कार्यक्रमातील काही सीन घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यात फेरफार केले होते. त्यानंतर त्याच्या डिपफेक व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगला व्हायरल होत आहे.

- Advertisement -

गेल्या वेळेच्या निवडणुकीदरम्यान आमीरने संपूर्ण देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन करून जनजागृती केली होती. मात्र त्याने कुठल्याही पक्षाचा प्रचार केला नव्हता. तरीही त्याच्या डिपफेक व्हिडीओ गैरवापर करून तो एका पक्षाचा प्रचार करत असल्याचे दाखविण्यात आले होते. हा प्रकार अलीकडेच आमीर खानच्या निदर्शनास आला होता.

हेही वाचा – Shilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

- Advertisement -

हा व्हिडीओ फेक असल्याचे लक्षात येताच त्याच्यावतीने त्याच्या प्रवक्त्याने खार पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासात सोशल मीडियावर व्हायरल झालेला आमीरचा व्हिडीओ बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा खार पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.


मालाड-अंधेरीतील दोन घरफोडीत बारा लाखांची लूट

मुंबई : मालाड आणि अंधेरीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांत अज्ञात चोरट्याने सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केले. याप्रकरणी अंधेरी आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

52 वर्षांची तक्रारदार महिला मालाड येथे तिच्या पती आणि दोन मुलीसोबत राहते. तिचे पती लोन एजंटसह अन्नधान्य ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांना ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केले होते. त्यात सोन्याचे दागिने आणि सहा लाखांच्या कॅशचा समावेश आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

हेही वाचा – Mumbai Crime News : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा

दुसरी घटना अंधेरी येथे घडली. अंधेरीतील चकाला परिसरात तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते ऍमेझॉन लॉजिस्टिक्ससाठी दुबई कस्टमर सर्व्हिसमध्ये वर्क फ्रॉर्म होम काम करतात. गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर ते घरी झोपले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यांच्यासह इतर तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करुन घरफोडी केली होती. या घटनेत चोरट्यांनी सुमारे पाच लाखांचे दागिने, कॅश आणि इतर वस्तू चोरी करून पलायन केले होते. ही माहिती नंतर त्यांनी अंधेरी पोलिसांना दिली होती. याप्रकरणी अंधेरी आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीची नोंद करुन तपास सुरू केला आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -