घरक्राइमMumbai Crime News : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध...

Mumbai Crime News : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा

Subscribe

Mumbai Crime News : सुमारे 80 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी चेतन किशोर व्यास याच्यासह इतर तिघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने या टोळीने ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मुंबई : सुमारे 80 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी चेतन किशोर व्यास याच्यासह इतर तिघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने या टोळीने ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार अंधेरीतील एका नामांकित ज्वेलर्स दुकानात सेल्स मॅनेजर म्हणून कामाला आहे. (Mumbai Crime News 80 lakh fraud on the pretext of giving cheap gold; case registered against four)

तक्रारदार दहा वर्षांपासून चेतनचा परिचित असून त्याचा चांगला मित्र आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणार्‍या लोकांचे सोने चेतन याने तक्रारदाराला स्वस्तात मिळवून दिले होते. बँकेकडून अशा सोन्याचे लिलाव होत असून ते सोने त्यांना दिल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्‍वास संपादन केला. एका बँकेने 2300 ग्रॅम वजनाचे सोने लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चेतनने तक्रारदाराला दिली. ते सोने स्वस्तात देतो असे सांगत त्याने तक्रारदाराला या संपूर्ण व्यवहारात एक कोटी आठ लाख रुपयांचा फायदा होईल असे सांगितले. त्यातील काही रक्कम त्याला कमिशन म्हणून देण्याचे ठरले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी लिलावातील सोने खरेदीसाठी त्याला ऐंशी लाख रुपये दिले. मात्र त्याने त्यांना सोने दिलेच नाही. पैशांची मागणी केल्यानंतर तो त्यांना सतत टाळण्याचा प्रयत्न करत होता. चेतनसह इतर तिघांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चेतन आणि त्याच्या सहकार्‍यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime News : गुंतवणुकीच्या नावाने दीड कोटींची फसवणूक; हॉटेल व्यावसयिकाविरुद्ध गुन्हा दाखल
———————————————————

Crime News : दागिन्यांचा अपहार करून फसवणूक; पाच व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा

मुंबई : शुद्ध सोन्याच्या मोबदल्यात दागिने देण्याची विनंती करुन पाच व्यापार्‍यांकडून सुमारे 83 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या भरत रमेशचंद्र सुरू या व्यापार्‍याविरुद्ध एल.टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरतविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

- Advertisement -

भरत हा ज्वेलर्स असून त्याच्या मालकीचे काळबादेवी परिसरात एक ज्वेलर्स दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तक्रारदार व्यापार्‍याकडून काही सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने त्यांना शुद्ध सोने आणि उर्वरित कॅश पेमेंट देण्याचे मान्य केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोने किंवा कॅश पेमेंट काहीच केले नाही. चौकशीदरम्यान अशाच प्रकारे इतर चार व्यापाऱ्यांकडून सोन्याचे दागिने घेतल्याचे समोर आले. मात्र त्यापैकी कोणालाही शुद्ध सोने किंवा त्यांच्या दागिन्याचे पेमेंट केले नव्हते. पाच व्यापार्‍यांची फसवणूक केल्यानंतर भरत दुकान बंद करुन पळून गेला. हा प्रकार निदर्शनास येताच या पाचही व्यापार्‍यांनी एल.टी मार्ग पोलिसात धाव घेतली. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून भरतविरुद्ध 83 लाखांच्या सोन्याचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या भरतचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. भरतने या पाच व्यापार्‍यांसह इतर काही व्यापार्‍यांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे सांगितले जाते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -