घरक्राइमफेसबुक फ्रेंडशिप पडली महाग, ५६ लाखाचा लावला चुना

फेसबुक फ्रेंडशिप पडली महाग, ५६ लाखाचा लावला चुना

Subscribe

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांंमध्ये वाढ होत आहे. यावर पोलिसांकडूनही अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन मैत्री करु नका किंवा कोणत्याही व्यक्तीशी ऑनलाईन पैशांचे व्यवहार करु नका असे आवाहन वारंवार केले जाते. मात्र नागरिकांकडून याचं चुका सतत घडताना दिसतायं. असाच काहीसा प्रकार अकोल्यात घडला आहे. अकोल्यात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फेसबुकच्या मैत्रीतून तब्बल ५६ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अकोला सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी नायजेरियन असून त्याचे नाव हॅरिसन इंगोला असे आहे. त्याला मुंबईतून अटक करण्यात आली. तर दुसऱ्या एका आरोपीला बंगळुरुमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अकोला सायबर पोलिसांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

आत्माराम शिंदे असे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून काही दिवसांपूर्वी त्यांची फेसबुकवर ‘रॅपगस्ट सुजी’ या कथित व्यक्तीशी मैत्री झाली. हा व्यक्तीने सतत आत्मराम शिंदे यांच्या संपर्कात राहत त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्याशी एका व्यक्तीने संभाषण केले. या फेसबुकवरील व्यक्तीने शिंदे यांना आपण अमेरिकेन सैनिक म्हणून सध्या सिरीया बॉर्डवर कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले. तसेच सिरीयामध्ये काम करताना एक अमेरिकन डॉलरने भरलेला बॉक्स मिळाल्याचे सांगत, ते तिघांमध्ये वाटून घेऊ. तसेच यातील आपल्या हिश्याला २५ कोटी रुपये एवढी रक्कम आली आहे. ही रक्कम अमेरिकेत घेऊन जाऊ शकत नसल्याने हे पार्सल भारतात पाठवतो असं त्या व्यक्तीने आत्मराम यांना सांगितले. तसेच तुम्हाला तीस टक्के रक्कम देऊ असेही तो व्यक्ती आत्माराम यांना म्हणाला.

- Advertisement -

त्यानंतर त्या व्यक्तीवर विश्वास देवून आत्माराम शिंदे यांना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ई-मेल, जवळील एअरपोर्ट याबाबत सविस्तर माहिती मागितली. त्याने मागितलेली सर्व माहिती शिंदे यांनी त्याला दिली. आत्माराम यांच्याशी संपर्क वाढविल्यानंतर त्या व्यक्तीने एक गिफ्ट पाठविल्यांचं सांगितले. ते सोडवून घेण्यासाठी आत्मराम शिंदे यांच्याकडून टप्प्याटप्याने ५६ लाख रुपये उकळण्यात आले. यासाठी आत्मराम शिंदे यांनी कमाईतून खरेदी केलेले तीन प्लॉट विकले. यातून आलेली रक्कम एकापाठोपाठ अशी २२ वेळा वेगवेगळ्या खात्यात पाठवली. अशी एकूण ५६ लाख ६० हजार ९९श्र रुपये एवढी मोठी रक्कम पाठवण्याच आली. मात्र यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस तक्रा दाखल केली. यात हॅरिसन इंगोला या नायजेरियन नागरिकाला अटक केल्यानंतर एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट अकोला पोलिसांकडून उघड होण्याची शक्य़ता आहे.

अकोला सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यात फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा रॅपगस्ट सुजी, रिधी गुप्ता (रा. आनंदापूर ,कोलकाता), आशिष कुमार (कॅनरा बँक, नवी दिल्ली), नसीमुद्दीन (रा. राजाजीनगर, बंगरळुरु), सिबानू कायपेंग (रा. पेरांबूर, केरळ), इम्रान हुसेन (रा. बंगळुरु), सोबीनोय चकमा (रा. जमनानगर, गुजरात), रमलज्योती चकमा (रा. एमजी रोड, बंगळुरु), अशोक (रा. दिल्ली), अँथनी (रा. सिरिया) यांचा आरोपींचा समावेश आहे. मात्र या आरोपींच्या अटकेनंतर ऑनलाईन फसवणूकचे जाळे नायजेरिया, सिरिया या देशांसह भारतातील दिल्ली, बंगळुरु, मुंबई, गुजरात अन केरळ या ठिकाणी पसरले असल्याचे उघड झाले.

- Advertisement -

अभ्यासासाठी तगादा लावला, मग मुलीने कराटे बेल्टने केली आईची हत्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -