Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या आईची हत्या

माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या आईची हत्या

वडिलांनीच हत्या केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं.

Related Story

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या आईची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या रमाकांत पाटील यांचे ८५ वर्षाचे वडील बाळाराम पाटील यांनीच केली, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. पार्वती पाटील (८०) असं माजी नगरसेवकाच्या मृत आईचे नाव असून बळीराम पाटील असं आरोपीचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने वार करुन पार्वती पाटील यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह बेडरुममध्ये जाळण्याचासुद्धा आरोपीने प्रयत्न केला.

माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे आई वडील आणि कुटुंबियांसह डोंबिवली पूर्व गोळीवली गाव या ठिकाणी राहतात. रमाकांत पाटील यांचे वडील बाळाराम पाटील आणि आई पार्वती पाटील यांच्यात वाद सुरु होते. घरगुती वादातून पहाटेच्या सुमारास बाळाराम पाटील यांनी वृद्ध पत्नी पार्वती यांची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्या केल्यानंतर बेडरुममध्ये मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केला.

- Advertisement -

शनिवारी रात्री पार्वती या पती बाळाराम यांच्यासोबत त्याच्या बेडरूम मध्ये झोपल्या होत्या. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्या रक्तरंजित अवस्थेत बेडरूम मध्ये आढळून आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर, गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांच्या जखमा आढळून आल्या आहेत. पार्वती यांचे पती बाळाराम हे बेडरूम मध्ये नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला असता गुन्हे शाखा घटक ३च्या पथकाला ते डोंबिवली तुकाराम नगर येथे एका नातेवाईकाच्या घरी आढाळले. गुन्हे शाखेने बाळाराम यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. पती पत्नी यांच्यात घरगुती वाद झाला, या वादातून पहाटेच्या सुमारास बाळाराम पाटील यांनी वृद्ध पत्नी पार्वती यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

 

- Advertisement -