घरक्राइमश्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! प्रेयसीची गोळी मारून हत्या अन् तिथेच जाळला मृतदेह

श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती! प्रेयसीची गोळी मारून हत्या अन् तिथेच जाळला मृतदेह

Subscribe

छत्तीसगडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका खासगी बँकेत काम करणाऱ्या तरुणीची तिच्या प्रियकराने जंगलात नेऊन गोळी मारून हत्या केली. इतक्यावरच तो थांबला नाही, त्याने मृत प्रेयसीचा मृतदेह लपवण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला आहे. छत्तीगडमधून हा प्रियकर गोड बोलून प्रियकराला ओडिशाला घेऊन गेला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात राहणारी 21 वर्षांची तनु कर्रे ही रायपूरमधील एका खासगी बँकेत काम करत होती. ती 21 नोव्हेंबरला तिचा प्रियकर सचिन अग्रवालसोबत ओडिशाच्या बालंगीरला गेली होती. यावेळी तनुने प्रवासादरम्यान कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे फोनवर बोलणे होऊ शकले नाही, ओडिशाला पोहचल्यापासून प्रियकर सचिन तिला घरच्यांशी बोलण्यास देत नव्हता, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

- Advertisement -

यादरम्यान आरोपी प्रियकर सचिनने त्याची प्रेयसी तनुची हत्या केली होती. यावेळी तिच्या कुटुंबियांना ती जिवंत असल्याचे भासवण्यासाठी तो त्यांच्याशी चॅटवर बोलत होता. तो तिच्या कुटुंबियांचे फोन उचलत नव्हता, यामुळे संशय आल्याने तनुच्या कुटुंबियांनी रायपूर पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली. याचदरम्यान रायपूर पोलिसांना बालंगीरमध्ये एक जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. हा मृतदेह तुनचाच होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पहिला संशयित सचिनला ताब्यात घेतले. जो सतत आपले लोकेशन चेंज करत होता. यावेळी पोलिसांनी अखेर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तुनचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते म्हणून त्याने तिची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आरोपी प्रियकर सचिन प्रेयसी तनुला फिरायला घेऊन जातो सांगून तिला बालंगीरमधील जंगलात नेते. जंगलात नेत तिच्यावर गोळी झाडली, यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला, असे पोलिसांनी सांगितले आहेत.


छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना; खाण कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -