घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना; खाण कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना; खाण कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Subscribe

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जगदलपूरपासून 11 किलोमीटर अंतरावरील माझगावमधील खाण अचानक कोसळली, या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 12 हून अधिक गावकरी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील या दुर्घटनेत बरेच लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरु केले आहे. आत्तापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. खाणीत अद्याप 5 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरचं अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

14 नोव्हेंबरला मिझोरामच्या हंथिया जिल्ह्यातही दगडखाण कोसळल्याची घटना घडली होती. खाणकाम सुरु असताना अचानक मोठे दगड तुटून खाली पडले, यात 12 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यावेळी आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य केले. या अपघातात अडकलेल्या सर्व मजूरांचा मृत्यू झाला होता.


महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी? चंद्रपूर, सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून शोधकाम सुरू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -