घरक्राइमऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज अन् बदनामीची धमकी; MBA च्या विद्यार्थ्यासह पाच जणांना...

ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज अन् बदनामीची धमकी; MBA च्या विद्यार्थ्यासह पाच जणांना बेड्या

Subscribe

पोलिसांना पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने 8000 रुपये कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज दिल्यानंतर आरोपींनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर मॉर्फ केलेला व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत 93,000 रुपये वसुल केले.

ऑनलाईन व्यवहारांचे वाढते प्रमाण पाहता आता अनेक व्यावसायिक वेबसाईट्स देखील ग्राहकांना ऑनलाईन कर्जाची सुविधा देत आहे. मात्र या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज देत अनेकांची फसवून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाचप्रकारे ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन नंतर अतिरिक्त पैसे उकळण्यासाठी बदनामीची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी कर्नाटकातील धारवडमधून पोलिसांनी MBA च्या विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक केली आहे.

या आरोपींचे पीडितांकडून 40000 रुपये वसुल करण्याचे लक्ष्य असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. सुहेल सय्यद (24), अहमद रजा हुसेन (26), सय्यद अख्तर (24), मुफ्तियाज परिजादे (21) आणि मोहम्मद कैफ कादरी (23), सर्व कर्नाटकातील धारवाड अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. आरोपींमधील एक MBA चा विद्यार्थी आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सायबर कार्यालाl NCCRP पोर्टलच्या माध्यमातून लोन अ‍ॅपसंदर्भात एकूण 2084 तकारी नोंदवण्यात आल्या होत्या. या कर्ज अ‍ॅप फसवणूकीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे पोलिसांकडूनही सांगण्यात आले, या वाढत्या घटना पाहता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 24 ते 27 पीडियांशी संपर्क साधला, यावेळी एका पीडितेच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांना पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने 8000 रुपये कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज दिल्यानंतर आरोपींनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर मॉर्फ केलेला व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत 93,000 रुपये वसुल केले. या कर्ज अ‍ॅप प्रकरणी महाराष्ट्र सायबर नोडल पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंदविण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केली. यावेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी धुळ्यातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, यावेळी चौकशीदरम्यान पोलिसांना निदर्शनास आले की, संबंधित व्यक्तीकडील फोन नंबर्सचे व्हॉट्सअॅप हे त्यांच्या नकळत कोणीतरी दुसराच वापर होता.

- Advertisement -

यानंतर पोलिसांना तांत्रिक तपासात दिसून आले की, धुळ्यातील संबंधित व्यक्तीच्या नंबर्सचे व्हॉट्सअॅप धारवाड़ कर्नाटक येथील एक व्यक्ती वापरत होता. यावेळी पोलिसांनी पोलीस उपायुक्त, गुन्हे, धारवाड कर्नाटक यांच्याशी बातचीत करत आरोपींच्या शोध घेण्यासाठी आणि तपासासाठी एक पथक तयार केले. यावेळी कर्नाटक स्थानिक पोलीसांसह रात्रभर केलेल्या संयुक्त कारवाईत त्या एका आरोपीसह आणखी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पाचही आरोपींना बेड्या ठोकत न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.


त्रिमूर्ती चौकातील मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघे मित्र ताब्यात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -