कोकणात जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागात मुलाने केला आईवर कोयत्याने हल्ला

कोकणात (Kokan) जाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे.

youth refused to hug a friend due to his friend attacked him through knife

कोकणात (Kokan) जाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. ईश्वर प्रकाश गलांडे (३८) असे या मुलाचे नाव असून नंदा प्रकाश गलांडे (६६) असे त्या मुलाच्या आईचे नाव आहे. (boy attacked on his mother with a scythe)

पुण्याच्या येरवाड पोलीस ठाण्याच्या (Pune Yerwad Police Station) हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ईश्वर प्रकाश गलांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक (Arrest) केली आहे.

नमके प्रकरण काय?

आरोपी ईश्वरला मित्रांसोबत कोकणात फिरायला जायचे होते. फिरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आईकडे पैसे मागितले. परंतु, आईने (Mother) पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या मुलाने आईवरच कोयत्याने हल्ला केला. आईला शिवीगाळ करत त्याने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने आईचा डोक्यावर वार केले त्यानंतर आईला त्याच अवस्थेत सोडून तो पळून गेला.

हेही वाचा – लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला उत्तरप्रदेशातून अटक; पुणे एटीएसची कारवाई

त्यानंतर या घटनेची माहिती स्वत: आईने पोलिसांना दिल्याचे समजते. दरम्यानं गंभीर जखमी झालेल्या आनंदा यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

पुर्व वैमनस्यातून गोळीबार

पुण्याच्या फॅशन स्ट्रीट (Pune Fashion Street) परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस (Police) संबंधित हल्लेखोराचा तपास करत आहेत.


हेही वाचा – जुहू चौपाटी येथील समुद्रात तिघेजण बुडाले; एकाला वाचवण्यात यश