Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, SEBI ने शिल्पा शेट्टी,...

Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, SEBI ने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह चौघांवर ठोठावला लाखोंचा दंड

Related Story

- Advertisement -

पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रां याला अटक केली. मात्र या अटकेनंतरही शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा समोरील अडचणींचा डोंगर कमी व्हायचे नाव घेत नाही. मुंबई पोलिसांपाठोपाठ आता सेबीने शिल्पा शेटी आणि राज कुंद्रावर मोठी कारवाई केली आहे. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय राज कुंद्रा, रिपु कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवरही सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राज कुंद्रा हाच पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचं म्हणत २० जुलैला मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. यासंबंधीचे पुरावेही मिळाले असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. या अटकेनंतर वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असून यातही काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहे. या पुराव्यातून राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून दर महिन्याला कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार होत असल्याचे उघड झाले. आत्तापर्यंत राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

- Advertisement -


पॉर्न चित्रपट निर्मिती आणि अॅप्स प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थोर्पे यांचा जामीन मुंबई न्यायालायने फेटाळला आहे. तर मंगळवारी न्यायालयाने राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. याशिवाय मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी राज कुंद्राला सात दिवसांचा पोलीस रिमांड मागितला होता. मात्र न्यायालयाने गुन्हे शाखेच्या रिमांडची मागणी तीन वेळा फेटाळून लावली.

पॉर्न चित्रपट निर्मिती आणि अॅप्स प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर सध्या पोलिसांच्या हाती येत आहे. या पॉर्न चित्रपट प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. तसंच विआन आणि दुसऱ्या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली आहे. पॉर्न फिल्मच्या बदल्यात राज कुंद्राने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. याशिवाय आता अंमलबजावणी संचालनालय देखील राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराांची चौकशी करणार आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, राज कुंद्रा याने पॉर्न फिल्म निर्मिती आणि ऑनलाइन रिलीजमधून गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान जवळपास १.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


ऑगस्टपासून Twitter आणि Facebook संबंधित ‘हे’ 3 नियम बदलणार, जाणून घ्या डिटेल्स

- Advertisement -