घरमहाराष्ट्र..म्हणून रोईंगपटू दत्तू भोकनळने दिला लष्करी सेवेचा राजीनामा

..म्हणून रोईंगपटू दत्तू भोकनळने दिला लष्करी सेवेचा राजीनामा

Subscribe

रोईंगपटू दत्तू भोकनळची खंत; शेतकरी नेते फोडणार अन्यायाला वाचा

आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळला रोईंग फेडरेशनने अचानक सराव बंद करण्यास सांगितले. त्यामुळे त्यास टोकियो ऑलम्पिकला मुकावे लागले. लष्करी सेवेत असल्याने फेडरेशनविरुद्ध जाहीरपणे बोलता येत नसल्याने नैराश्येतून राजीनामा दिल्याची खंत रोईंगपटू दत्तू भोकनळने व्यक्त केली आहे.

दत्तूवर झालेल्या अन्यायाबाबत पुणतांब्याचे किसान क्रांतीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक योगेश रायते यांनी थेट तळेगाव रोहिला दत्तूच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी दत्तूने झालेल्या अन्यायाची माहिती दिली.

- Advertisement -

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या खेडेगावातील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील दत्तू भोकनळने लष्करी सेवेतून रोईंगपटू म्हणून देशाला ‘आॉलिम्पिक २०१६’मध्ये रोईंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवत केलेल्या कामगिरीमुळे भारत सरकारने क्रीडाविश्वातील देशपातळीवरील मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या सुरु असलेल्या टोकिओ आलिम्पिकमध्ये पुन्हा देशाला सुवर्णपदक मिळवण्यासाठी दत्तू जीवतोड सराव करत होता. त्याची गुणवत्ता व क्षमता नक्कीच सुवर्णपदकाची होती. तरीही रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाने दत्तूवर अन्याय करत सराव शिबिरातून बाहेर जाण्यास सांगितले. याबाबत भोकनळने जाहीरपणे माझे काय चुकले, असा सवाल केला. त्यामुळे हा सर्व प्रकार समजून घेण्यासाठी पुणतांब्याचे किसान क्रांतीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक योगेश रायते यांनी थेट तळेगाव रोहिला दत्तूच्या घरी भेट दिली. यावेळी त्याने अन्यायाबाबत जाहीरपणे बोलता येत नसल्याने नैराश्यातून राजीनामा दिल्याचे सांगितले. शेतकरी नेत्यांनी दत्तूला न्याय मिळेपर्यंत पाठीशी उभे राहणार असल्याचा निर्धार केला आहे. मदत करा, मी रोईंगमधील सलग दुसरे सुवर्णपदक घेणारच, असा आत्मविश्वास दत्तूने व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंत्री व पालकमंत्री भुजबळ यांना कळवण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातून दत्तू भोकनळवर झालेल्या अन्यायाबद्दल माहिती मिळाली. सत्य परीस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन सविस्तर माहिती घेतली, तेव्हा जाणीवपूर्वक भोकनळ यांना डावलण्यात आल्याचे लक्षात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून देशाला बहुमान मिळवून देणार्‍या शेतकरी पुत्रावर होणारा अन्याय चिड आणणारा आहे. भोकनळ यांना न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा तर करुच, मात्र प्रसंगी आंदोलनही करू.
– हंसराज वडघुले, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष शेतकरी संघटना, महाराष्ट्र

पुणे ऑलिंपिक शिबिरामध्ये माझा सराव व्यवस्थित सुरू होता. २०१६ च्या ऑलम्पिकमध्ये मी जो टाईमिंग दिला होता, त्यापेक्षा चार सेकंद मी तो टाइम कमी केला. त्यानंतर शिबिरांमधून अचानकपणे मला बाहेर जाण्यास सांगितले. २७ नोव्हेंबर २०२० पासून आतापर्यंत बर्‍याच वेळेस रोइंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे मला बाहेर जाण्यास का सांगितले, हे विचारले. अजूनही उत्तर मिळालेले नाही. या नैराश्यातून मी लष्कर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण, मला आर्मीत राहून माझ्यावरील अन्यायाबाबत जाहीरपणे बोलता येत नव्हते. – दत्तू भोकनळ, रोईंगपटू

अर्जुन पुरस्कारप्राप्त आलिम्पियन दत्तु भोकनळ यांची गुणवत्ता व क्षमता यामुळे रोईगमध्ये देशाला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळालेले आहे तसेच आज सुरु असलेल्या टोकीओ आलिम्पिकसाठी दत्तुचा कसुन सुरु असलेला सराव व टाईमिंग पुन्हा देशाला सुवर्णपदक मिळऊन देणारा आसतांनाहि रोईंग फेडरेशन आफ इंडीया यांनी येनकेनप्रकारे दत्तुवर अन्याय करत सराव शिबिरातुन बाद केल्याने देशाला व दत्तुला सुवर्णपदकाला मुकावे लागले आहे यामुळे क्रीडाप्रेमींचे मनोबल खच्चीकरण होत असल्याने भोकनळ यांना न्याय मिळऊन देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी संघटीत व्हावे.
– धनंजय जाधव, मुख्य समन्वयक, किसान क्रांती महाराष्ट्र राज्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -