घरक्राइमSEBI : टीव्हीवर शेअर खरेदी-विक्रीची माहिती देणं पडलं महागात; सेबीने ठोठवला कोट्यवधींचा...

SEBI : टीव्हीवर शेअर खरेदी-विक्रीची माहिती देणं पडलं महागात; सेबीने ठोठवला कोट्यवधींचा दंड

Subscribe

नवी दिल्ली : एका व्यावसायिक टीव्ही चॅनलवर अतिथी तज्ज्ञांना शेअरची माहिती देणं महागात पडलं आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अतिथी तज्ज्ञांवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने 15 अतिथी तज्ञांवर बंदी घातली आहे. याशिवाय, आपल्या अंतरिम आदेशात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यासही सांगितले आहे. अवैध व्यापारामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सेबीने म्हटले आहे. (SEBI Giving information on share buying and selling on TV has become expensive SEBI imposes a fine of crores)

हेही वाचा – Politics : इंडिया आघाडीला गळती; ‘भारतरत्न’देऊन भाजपाने आणखी एक विकेट काढली?

- Advertisement -

सेबीने म्हटले की, 1 फेब्रुवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान ‘झी बिझनेस’ वर उपस्थित असलेल्या 15 तज्ज्ञांवर कारवाई करण्यात आली आहे. निर्मल कुमार सोनी, पार्थ सारथी धर, एसएआर कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मनन शेअरकॉम प्रायव्हेट लिमिटेड, कन्ह्या ट्रेडिंग कंपनी, नितीन छलानी, रूपेश कुमार माटोलिया, अजयकुमार रमाकांत शर्मा, एसएआर सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रामावतार लालचंद चोतिया, किरण जाधव, केळकर, मुदित गोयल, हिमांशू गुप्ता, सिमी भौमिक या तज्ज्ञांवर कारवाई करण्यात आली आहे. या 15 तज्ज्ञांपैकी काहींचा थेट व्यापारात सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यावर पुढील आदेशापर्यंत बाजारात खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना 7.41 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा – Dahisar Firing : ‘एखाद्या श्वानावर गाडी गेली तरी गृहमंत्री जबाबदार’; फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोले संतापले

- Advertisement -

नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न

सेबीच्या सांगितले की, अतिथी तज्ज्ञांनी चॅनेलवर प्रसारित होण्यापूर्वी काही संस्थांकडे असलेल्या स्टॉकच्या टिप्स दिल्या होत्या. या लोकांनी आधीच मिळालेल्या माहितीवर तज्ज्ञांचे मत देऊन 7.41 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जे बेकायदेशीर आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय म्हणाले की, ज्यांना नोटीस मिळाली आहे, त्यांनी अनेक टप्प्यात आपले स्थान तयार केले आहे, जे सेबीच्या नियमांच्या विरुद्ध असल्याचे आढळून आले आहे. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, अतिथी तज्ज्ञांनी टीव्ही चॅनेलवर नफा कमावणाऱ्यांशी आधीच माहिती सामायिक केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -