घरक्राइममुंबईत ड्रग्जमिश्रीत औषधांच्या तस्करीत एका आरोपीला अटक

मुंबईत ड्रग्जमिश्रीत औषधांच्या तस्करीत एका आरोपीला अटक

Subscribe

या गुन्ह्यांतील ही दुसरी अटक असून यापूर्वी याच गुन्ह्यांत शिवम पियुष हिंडीया ऊर्फ समीर शेख या आरोपीस या अधिकार्‍यांनी अटक केली.

एनसीबीने मुंबईत अनेक ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना अनेकांना ताब्यात घेतले आहे. मुंबईत आज एनसीबीने लाखो रुपयांच्या ड्रग्जमिश्रीत औषधांच्या तस्करीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या हेमराज गणेशराम पटेल या आरोपीस अटक करण्यात आली. या गुन्ह्यांतील ही दुसरी अटक असून यापूर्वी याच गुन्ह्यांत शिवम पियुष हिंडीया ऊर्फ समीर शेख या आरोपीस या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर हेमराजला लोकल कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत मरिनलाईन मॉडेल पोस्ट ऑफिस कार्यालयातून एनसीबीच्या अधिकार्‍यांनी एक पार्सल जप्त केले होते. त्यात डिझापेमचे पाचशे, अल्प्राझोलमचे एक हजार आणि फिनास्त्रेडचे बाराशे ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा साठा जप्त केला होता.

याच गुन्ह्यांत फेब्रुवारी महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात समीर शेख ऊर्फ शिवम हिंडीया याला एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्या चौकशीत हेमराज याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स एनसीबीने बजाविले होते. गुरुवारी हेमराज हा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. चौकशीनंतर त्याला एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या गोळ्यांच्या खरेदीच्या व्यवहारात हेमराजचा सहभाग उघडकीस आला होता. हेमराज हा मूळचा राजस्थानच्या पाली, किडवाई नगरचा रहिवाशी असून सध्या तो शीव येथील शीव-वांद्रे लिंक रोड, डिस्कव्हरी बारजवळील नाईक नगर परिसरात राहतो. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे. तो आणखीन कोणत्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता याची चौकशी एनसीबी करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून सासरच्यांनी मुलीला सून म्हणून नकारले, प्रेमी युगुलांनी आपले आयुष्यचं संपवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -