घरताज्या घडामोडीकाय सांगताय ? ट्रेन १ मिनिटं उशिरा आली अन् ३६ रुपये...

काय सांगताय ? ट्रेन १ मिनिटं उशिरा आली अन् ३६ रुपये पगार कापला ; ड्रायव्हरने मागितली ‘इतक्या’ लाखांची भरपाई

Subscribe

भारतात गाड्या उशिरा येणे हे साहजिक आहे.मात्र...

भारतात ट्रेन उशिरा येणे ही सामान्य गोष्ट आहेच याशिवाय ट्रेनमुळे इतर कामांना उशिर होणे हेसुद्धा भारतीयांसाठी स्वाभाविकच आहे. भारतात कुठेही जाण्यासाठी खिशाला परवडणारे आणि वेगवान साधन म्हणूनही रेल्वेची ओळख आहे. पण रेल्वेचं उशिरा येणं म्हणजे प्रवाशांसाठी अनेकदा डोकेदुखी ठरते. मात्र तरीदेखील या ‘लेट लतिफ’  रेल्वेच्या उशिरा येण्याशी प्रवासी नेहमीच जूळवून घेतात. परंतु जगात असे अनेक देश आहेत जिथे ट्रेन अचूक वेळेवर धावतात. जर ही अचूक वेळ नाही पाळली तर, वेळ न पाळणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. जपान याबाबतीत आघाडीवर आहे. जपानमध्ये गाड्या एक मिनिटही उशिरा येत नाहीत आणि असं झालं तर गदारोळ होतो. अशीच एक घटना जपानमध्ये समोर आली आहे, जेव्हा ड्रायव्हरच्या चुकीमुळे ट्रेनला सुमारे एक मिनिटं उशीर झाला आणि त्यानंतर रेल्वेने ड्रायव्हरच्या पगारातून ५६ येन म्हणजेच सुमारे ३६ रुपये कापण्याचे आदेश दिले.

ड्रायव्हरने मागितली १४ .३ लाखांची भरपाई

जपान रेल्वेच्या या आदेशानंतर ट्रेन चालक आता कोर्टात पोहोचला असून, त्याने २.२ मिलियन येन म्हणजेच सुमारे १४.३७ लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. ड्रायव्हरने आपली प्रतिमा, ओव्हरटाईम कट, मानसिक त्रास, नोकरीतील समस्या आदी कारणांमुळे जपान रेल्वेकडे १४ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

गेल्या वर्षी १८ जून रोजी ड्रायव्हर ओकायामा स्टेशनवरून रिकामी ट्रेन घेण्यासाठी निघाला होता, पण अचानक त्याच्या पोटात दुखू लागले आणि तो बाथरूममध्ये गेला. त्याने आपल्या कनिष्ठ चालकाकडे कारभार सोपवला, मात्र त्याने चुकीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन चालवली आणि त्यामुळे ट्रेनला एक मिनिटं उशीर झाला. यानंतर पश्चिम जपान रेल्वे कंपनीने कारवाई करत चालकाच्या पगारातून ८५ येन म्हणजेच सुमारे ५५.५७ रुपये कापण्याचे आदेश दिले.

जपान रेल्वेच्या निर्णयाविरोधात चालकाने ओकायामा लेबर स्टँडर्ड इन्स्पेक्शन ऑफिस गाठले आणि दंड हटवून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, रेल्वेने कपातीचे समर्थन करत या काळात कोणतेही काम झाले नसल्याचे सांगितले. तथापि, कंपनीने दंड ५६ येन किंवा सुमारे ३६ रुपये कमी केले. त्यानंतर ड्रायव्हर ओकायामा जिल्हा न्यायालयात पोहोचला आणि त्याने युक्तिवाद केला की ट्रेन उशिरा आल्याने त्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही, कारण त्यावेळी ट्रेन रिकामी होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – जाऊन रडत बस…कंगणाने वरूण गांधींना सुनावलं..


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -