घरदेश-विदेशदेशातील सर्वात वयस्कर व्यक्तीने घेतली कोरोनाची लस; देशाला लस घेण्याचे केले आवाहन

देशातील सर्वात वयस्कर व्यक्तीने घेतली कोरोनाची लस; देशाला लस घेण्याचे केले आवाहन

Subscribe

वयवर्ष १०३ असणाऱ्या व्यक्तीचे नाव श्याम सरन नेगी असे असून या व्यक्तीला भारतातील सर्वात वयस्कर मतदार म्हणून ओळखले जाते

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना कोरोना नियंत्रणात राहण्यासाठी किंवा त्याचा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहेत. दरम्यान, १०३ वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतली आहे. वयवर्ष १०३ असणाऱ्या व्यक्तीचे नाव श्याम सरन नेगी असे असून या व्यक्तीला भारतातील सर्वात वयस्कर मतदार म्हणून ओळखले जाते. श्याम सरन नेगी यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राज्याच्या राजधानीपासून सुमारे २७५ किमी. अंतरावर कल्पायेथे लस घेतल्यानंतर श्याम सरन नेगी म्हणाले, “कोरोना व्हायरस लस घेण्यास जे पात्र आहेत त्या सर्वांना कोरोना लस घ्यावी, असे मी आवाहन करीत आहे.”

श्याम सरन नेगी यांनी १९५१-५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाग घेतला होता, ही निवडणुक देशातील पहिली मतदान प्रक्रिया होती. १९५१ मध्ये सेवानिवृत्त शालेय शिक्षिक नेगी हे निवडणूक ड्यूटीवर होते आणि त्यांनी चन्नी मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला होता. यानंतर किन्नौरचे नावच उंचावले. नेगी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला. या लसीकरण केंद्रात डॉक्टरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

- Advertisement -

नेगी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह लसीकरण केंद्रावर पोहोचले. लसीकरणानंतर त्यांना प्रोटोकॉलनुसार अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हिमाचल प्रदेशातील कल्पा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून २ हजार ७५९ मीटर उंचीवर आहे. तर निवडणुकीच्या वेळी उपायुक्त हेमराज बैरवा यांनी नेगी यांच्या घरापासून ४०० मीटर अंतरावर तयार केलेल्या हिमच्छादित मतदान केंद्रात त्यांचे जोरदार स्वागत केले. बैरावा यांनी माध्यमांना सांगितले की, “नेगी हे भारतातील सर्वात वयस्कर मतदार समजले जातात. मतदान करणं हा एक महत्वाचा प्रसंग आहे, यावेळी मतदानासाठी ते कोणतीही मदत न घेता मतदान केंद्रावर पोचण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात. मतदानानंतर मतदान करणे का महत्त्वाचे आहे हे देखील ते देशाला सांगतात. “

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -