घरमनोरंजनअनुपम खेर यांनी घेतली कोरोना लस

अनुपम खेर यांनी घेतली कोरोना लस

Subscribe

अनुपम खेर यांनी कोरोना लसीचा डोस घेतला असून लस घेतानाचा एक मजेशीर व्हिडिओ ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासंबंधीची पोस्ट त्यांनी स्वत: सोशल मीडियावर केली आहे. अनुपम खेर यांच्या सोबत त्यांच्या आईनेही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण करतानाचा अनुपम खेर यांनी एक मजेशीर व्हिडिओही प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते लस घेताना घाबरलेले दिसत आहेत. व ओम नम: शिवाय असा जप करत त्यांनी कोरोनाची लस घेतवी आहे. अनुपम खेर यांनी लसीकरण करुन झाल्यावर डॉक्टरांचे आभार मानले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना अनुपम खेर असे म्हणाले की, मी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. हे शक्य केल्याबद्दल सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, भारत वैज्ञानिक आणि भारत सरकार यांचे आभार. इंडिया रॉक्स.. जय हो.. असे म्हणत त्यांनी लसीकरणात सहभागी असलेल्या सर्व सरकारी यंत्रणांचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

 व्हिडिओ मध्ये अनुपम डॉक्टरांशी बोलताना दिसत आहेत. अनुपम यांनी त्यांच्या आईचा ही कोरोना प्रतिबंधक लस घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे व हा व्हिडिओ शेअर करताना ते असे म्हणाले की, ”माझी आई लसीकरण करताना दिसत आहे आणि त्यात काही मजेदार क्षण आहेत. त्या सुरुवातीला म्हणाल्या, मला भीती वाटत नाही. मग त्यांनी डॉ. शिखा यांनाही तेच सांगितले आणि यापूर्वी त्याने किती गंभीर जखमा झाल्या आहेत याबद्दलही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारात त्यांनी मला गप्प बसण्यास सांगितले होते. त्याची चर्चा ऐकून डॉक्टर आणि कर्मचारीही हसत होते.” अशा संबंधीची गमतीशीर पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली आहे.

- Advertisement -

हे वाचा- लठ्ठपणामुळे अस्वस्थ होती विद्या बालन; करत होती स्वतःचाच तिरस्कार, म्हणाली…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -