घरदेश-विदेश११ आमदारांनी सोडली ममतांची साथ प. बंगालमध्ये तृणमूलला जबर हादरा

११ आमदारांनी सोडली ममतांची साथ प. बंगालमध्ये तृणमूलला जबर हादरा

Subscribe

निवडणुकीचा फड जसजसा जवळ येऊ लागला तसतसे प.बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला हादरे बसू लागले आहेत. भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एकेका आमदाराला आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११ आमदार भाजपच्या गळाला लागले असून, यातील अनेकजण ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा हे सध्या प.बंगालच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत तृणमूलच्या माजी खासदारासह आजी ११ आमदारांनीही भाजपत प्रवेश घेतला. यामुळे ममता बॅनर्जींना हा मोठा हादरा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतील माजी मंत्री असलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतला.

- Advertisement -

अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिल्यावर इतरांचाही भाजपकडे ओघ वाढल्याचे दिसते. निवडणूक येईपर्यंत तुम्ही एकट्याच राहाल, असे अमित शहा यांनी ममता यांना बजावले आहे. या राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप २०० जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

पाच वर्षे सत्ता द्या, आम्ही प.बंगालचे सोने करू, असे शहा म्हणाले. या राज्याची स्थिती बिकट झाली आहे. राज्याला वाचवायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या हाती सत्ता दिली पाहिजे, असे शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -