घरताज्या घडामोडीAIADMK च्या कार्यकर्त्यांनी १४ वर्षीय मुलीला जिवंत जाळले!

AIADMK च्या कार्यकर्त्यांनी १४ वर्षीय मुलीला जिवंत जाळले!

Subscribe

तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. एआयएडीएमके च्या दोन कार्यकर्त्यांनी १४ वर्षीय शाळेत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी ९५ टक्के भाजली आहे. डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी म्हटले आहे की, दोन्ही आरोपींनी मुलीचे हात, पाय बांधले, तोंडात कपड्याचा बोळा कोंबला आणि तीला आगीत ढकलं.

सिरूमदुराई कॉलनीत ही घटना घडली जेव्हा ही मुलगी आपल्या घरात एकटीच होती. आरोपींची मुलीच्या वडिलांबरोबर जूनं शत्रुत्व होतं  म्हणून त्यांनी असं वाईट कृत्य केलं. स्टालिन यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी पुढून ९५ टक्के भाजली आहे. तीला लगेचच सरकारी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं.

- Advertisement -

स्टालिन यांच्या म्हणण्यानुसार, एआयएडीएमके सदस्यांकडून मुलीला जिवंत जाळण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी २००० साली एआयएडीएमके सदस्यांनी धर्मपुरी येथे एका बसला आग लावली होती. ज्यामध्ये तमिळनाडू कृषि विश्वविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना जिवंत जाळण्यात आले होते. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.


हे ही वाचा – ४६ वर्षीय मलायकाला व्हायचय पुन्हा आई, लॉकडाऊनमध्ये करतेय प्लॅनिंग!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -