घरदेश-विदेश31st पार्टीसाठी पैसे नाही दिले; आजीला डोक्यात हातोडी घालून मारले!

31st पार्टीसाठी पैसे नाही दिले; आजीला डोक्यात हातोडी घालून मारले!

Subscribe

पोलिसांनी केलेल्या चौकशीत १९ वर्षीय नातवाची कबूली

नवं वर्षाच्या पार्टीला पैसे न दिल्याने आजीच्या डोक्यात नातवानं हातोडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आजीला मारहाण केल्याप्रकरणी १९ वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. पूर्व दिल्लीत शनिवारी ही घटना घडली असून ७३ वर्षांच्या आजीची नातवाने हातोडीच्या सहाय्याने हत्या केली. १९ वर्षाचा नातू करण जॉली याला पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय जॉली आपली आई, पत्नी आणि २ मुलांबरोबर दिल्लीतील रोहताश नगरमध्ये राहतो. संजय जॉली यांची आई सतीश जॉली तळ मजल्यावरील एका खोलीत कुटुंबासह राहत होती. रविवारी सकाळी त्यांनी पाहिले की त्यांच्या आईच्या खोलीचे दार बाहेरून बंद आहे. यावेळी सतीश यांना घराचे दार बंद असल्याचे समजताच त्यांनी आपला भाऊ मनोजसह बाबरपूर येथे राहणाऱ्या पोलिसांना फोन केला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा खोलीला बाहेरून कुलूप होते. ते तोडल्यानंतर वयोवृद्ध महिला सतीश एका खुर्चीवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्या आणि त्याच्या जवळ हातोडा ठेवलेला दिसला.

- Advertisement -

पोलिसांनी शेजारच्यांची चौकशी केली असता, सतीशच्या एका भाडेकरूने सांगितले की, शनिवारी रात्री सतीश यांचा मोठा नातू करण घरात खिळे मारण्यासाठी हातोडी मागण्यास आला होता. जेव्हा करणविषयी त्यांना समजले तेव्हा तो घरात नव्हता. तेव्हा पोलिसांनी करणचे वडील संजय यांना फोन केला, त्यानंतर काही वेळाने करण घरी परतला. १९ वर्षीय करणाला पोलिसांनी अटक केली तेव्हा कोठडीत असणाऱ्या करणची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने सांगितले की, आजीने नवीन वर्षाच्या पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने तिला ठार मारले. तो अनेकदा आपल्या आजीकडे मौजमजेसाठी पैसे घेत असल्य़ाचेही यावेळी त्यांनी सांगितले.


‘मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही’, कंगनानं सेनेला पुन्हा डिवचलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -