घरताज्या घडामोडीJammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, पोलिसांसह २४ जण जखमी तर एकाचा मृत्यू

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, पोलिसांसह २४ जण जखमी तर एकाचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. श्रीनगरमधील अमिरा कदल मार्केटमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना टार्गेट करत ग्रेनेड हल्ला केला. श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांसह २४ जण जखमी झाले आहेत. २४ जणांमध्ये २३ नागरिक आणि एका पोलिसाचा समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक पोलीस कर्मचारी आणि एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

याआधीही दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्ह्यात अशा प्रकारच्या कुरापती करण्यात आल्या आहेत. अनेकांना पकडण्यातही आलं आहे. वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल सतत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुंतलेले असतात. विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत असून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात आहे. त्यामुळे दहशतवादी संतापले असून, अशा हल्ल्यांद्वारे आपले कटकारस्थान राबवत आहेत.

हल्ल्याच्या एक दिवसाअगोदर जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले होते आणि तेथूनच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दहशतवादांच्या ठिकाणाहून दोन अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, एक एके-47 मॅगझिन, इन्सास रायफलच्या ४८ गोळ्या, एके-47 च्या १०राउंड, ९ एमएम शस्त्राच्या ३८ राउंड, चिनी पिस्तुलच्या दोन राउंड, एक चाकू आणि आणखी एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले होते.


हेही वाचा :IPL 2022 Schedule: आयपीएल २०२२चं शेड्यूल जारी, २६ मार्चला ‘हे’ दोन संघ भिडणार आमनेसामने, जाणून घ्या वेळापत्रक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -