घरCORONA UPDATELive update: गोव्यात २४ तासांत ९६३ नव्या रुग्णांची वाढ, २७ जणांच्या मृत्यूची...

Live update: गोव्यात २४ तासांत ९६३ नव्या रुग्णांची वाढ, २७ जणांच्या मृत्यूची नोंद

Subscribe
गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४ हजार ५०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५९ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाख १३ हजार २१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


गोव्यात २४ तासांत ९६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या गोव्यात १५ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोव्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५४ हजार ४१९वर पोहोचली आहे.
- Advertisement -


राज्यातील राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या- प्रकाश आंबेडकर

सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

- Advertisement -

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, लक्षणं ओळखून रुग्णांवर वेळीच उपचार करा : उद्धव ठाकरे


गजेंद्र पाटलांनी केलेले आरोप खोटे, अनिल परबांचे स्पष्टीकरण


कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. IPL चे उर्वरीत सामने आता UAE मध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.


मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्या हाती- संजय राऊत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव; गोपीचंद पडळकर आक्रमक


स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली


Corona Update : चिंता मिटली! देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

देशात गेल्या २४ तासांत १ लाख ७३ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर २ लाख ८४ हजार ६०१ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज देशात ३ हजार ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी  दुर्घटना घडली. या घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -